‘जेडीआयईटी’त दोन दिवसीय कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 09:49 PM2018-03-24T21:49:18+5:302018-03-24T21:49:18+5:30

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या सीएसआय क्लबतर्फे ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

Two-Day Workshop on JDIET | ‘जेडीआयईटी’त दोन दिवसीय कार्यशाळा

‘जेडीआयईटी’त दोन दिवसीय कार्यशाळा

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या सीएसआय क्लबतर्फे ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून नामांकित कंपनीतील तज्ज्ञ निशांत सिंग लाभले होते. प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख प्रा.जे.एच. सातुरवार, प्रा.ए.पी. जाधव, प्रा.व्ही.आर. शेळके यांची प्रामुख्याने उपस्थित होते.
निशांत सिंग यांनी आयआयटी मुंबई, आयआयटी बेंगलोर, एनआयटी कालिकत व सीओईपी पुणे आदी ठिकाणच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंटरनेट आॅफ थिंग्ज’ या विषयावर मार्गदर्शन केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड होण्यासाठी तसेच द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शोध निबंध व प्रोजेक्ट तयार करण्यासाठी या विषयावर मार्गदर्शनाची मदत होते.
संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख प्रा.जे.एच. सातुरवार यांनी कार्यशाळेची माहिती दिली. आॅरडीनो किट, आॅरडीनो सॉफ्टवेअर, टेंपरेचर सेंसर, माईसचर सेंसर, गॅस सेंसर, लाईट सेंसर, एलईडी लाईट डिस्प्ले, पझर अशा अनेक सेंसर व होम अ‍ॅप अ‍ॅटोमोशनसाठी लागणाऱ्या विविध सॉप्टवेअर व हार्डवेअर याचा संपूर्ण वापर मोबाईल अ‍ॅपमधून प्रत्यक्ष कसा करता येईल, याचे संपूर्ण मार्गदर्शनाचे प्रयोजन त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत मिळालेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थी आपल्या घरातील ट्यूब लाईट, पंखा, एसी, वॉशिंग मशीन आदी वीज उपकरणे सुरू किंवा बंदची प्रक्रिया स्वत: बनविलेल्या मोबाईल अ‍ॅपद्वारे हाताळू शकतात, असे त्यांनी सांगितले. संचालन समीक्षा जैन यांनी केले.

Web Title: Two-Day Workshop on JDIET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.