गुजरात, मुंबईला दररोज दोन कोटींचा ‘हवाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 09:22 PM2018-10-27T21:22:45+5:302018-10-27T21:23:10+5:30

कोट्यवधी रुपयांची अवैध सावकारी चालणाऱ्या यवतमाळातून आता हवाला मार्गे मुंबई व गुजरातमध्ये दरदिवशी किमान दोन कोटी रुपये पाठविले जात असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.

Two crores 'hawala' for every day in Gujarat, Mumbai | गुजरात, मुंबईला दररोज दोन कोटींचा ‘हवाला’

गुजरात, मुंबईला दररोज दोन कोटींचा ‘हवाला’

Next
ठळक मुद्देराजकीय पदाधिकाऱ्याची ‘दुकानदारी’ : पोलीस, प्राप्तीकर मेहेरबान

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोट्यवधी रुपयांची अवैध सावकारी चालणाऱ्या यवतमाळातून आता हवाला मार्गे मुंबई व गुजरातमध्ये दरदिवशी किमान दोन कोटी रुपये पाठविले जात असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हवाला सुरू असताना पोलीस, प्राप्तीकर विभाग गप्प कसा, याचे रहस्य कायम आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कुरिअर सर्विसच्या आड हवाला चालत असल्याची बाब सर्वश्रृत आहे. यवतमाळ शहरात प्रमुख एक-दोन नावे याबाबत नेहमीच चर्चेत राहतात. मध्यंतरी रक्कम लुटण्याच्या घटना घडल्याने यातील एक नाव पोलीस रेकॉर्डवरही आले आहे. परंतु आता कुरिअरच्या आडोशाने नव्हे, तर थेट हवालाचीच दुकानदारी यवतमाळात सुरू झाली आहे. या दुकानातून केवळ आणि केवळ हवालाचाच कारभार चालतो. यवतमाळमधून मुंबई आणि गुजरातमधील विविध प्रमुख शहरांसाठी दरदिवशी किमान दोन कोटी रुपयांची रोकड हवालाद्वारे पाठविली जाते. एकेकाळी यवतमाळ नगरपरिषदेची सूत्रे सांभाळणाऱ्या एका राजकीय पदाधिकाऱ्याची ही ‘दुकानदारी’ असल्याची माहिती आहे. राजकीय संबंधाच्या बळावर पोलिसांचे ‘कन्सेन्ट’ घेऊनच हवालाचा हा कारभार त्या पदाधिकाऱ्याने सुरू केला. पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष बघता हवालातील लाभाचे पाट त्यांच्यापर्यंतही वाहात असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
एरवी छुटपुट चुकांसाठी रस्त्यावरील हॉकर्स-फेरीवाल्यांना, वाहनधारकांना बाजीराव दाखविणाऱ्या संबंधित पोलिसांनी या हवाला व्यापाऱ्यांपुढे नांग्या टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबई शहरातून हिरे व्यापाºयांचा दरदिवशी हजारो कोटींचा हवाला गुजरातमध्ये चालतो.
हिरे व्यापाºयांच्या धर्तीवर हवाला
त्याच धर्तीवर आता यवतमाळातही मुंबई, गुजरातसाठी दरदिवशी किमान दोन कोटींचा हवाला सुरू झाला आहे. मात्र पोलीस व प्राप्तीकर खात्याची यंत्रणा या हवाला उलाढालीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने या हवाला व्यापाऱ्यांवर कारवाई करावी कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, कारवाईचे अधिकार असलेली शासकीय यंत्रणाच या हवाला व्यापाºयाच्या दावणीला बांधली गेली आहे.

Web Title: Two crores 'hawala' for every day in Gujarat, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.