बोंडअळीच्या पैशासाठी तहसीलवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:01 AM2018-09-06T00:01:32+5:302018-09-06T00:02:31+5:30

पोळ्याचा सण तोंडावर आला असतानाही बोंडअळीचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात न पडल्याने शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहे, तर प्रशासन बोंडअळीच्या याद्या दुरूस्तीपायी हैराण झाले आहेत.

Tremendous rush for coastal money | बोंडअळीच्या पैशासाठी तहसीलवर गर्दी

बोंडअळीच्या पैशासाठी तहसीलवर गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये रोष : लाभार्थी यादीत आढळल्या अनेक त्रुटी

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : पोळ्याचा सण तोंडावर आला असतानाही बोंडअळीचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात न पडल्याने शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहे, तर प्रशासन बोंडअळीच्या याद्या दुरूस्तीपायी हैराण झाले आहेत.
शासनाने गेल्यावर्षी आलेल्या बोंडअळीची नुकसान भरपाई म्हणून शेतकºयांना हेक्टरी सहा हजार ८०० रूपयांची आर्थिक मदत दिली आहे. तो पैसाही प्रशासनाकडे दिले आहे. परंतु लाभार्थी यादीत अनेक त्रुटी असल्यामुळे या लाभापासून अनेक शेतकरी वंचित आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बँकेत चौकशी केली असता, पैसे आले नसल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी शेतकरी तहसीलमध्ये गर्दी करीत आहे. अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावात व खाते क्रमांकात त्रुटी आहेत, तर अनेक लाभार्थी मय्यत असून त्यांच्या वारसांना लाभ देण्यास अडचणी येत आहे. आम्ही आमचे बँक खाते क्रमांक व नावे बरोबर दिली, यात महसूल प्रशासनाने घोळ केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तरीही तहसील प्रशासन याबाबत कोणतेच पाऊल उचलत नाही. यासंर्भात तहसीलदार विजय साळवे यांना विचारले असता, जवळपास एक हजार शेतकऱ्यांचा बँक खाते क्रमांक चुकीचा आहे, काही याद्यातील लाभार्थ्यांच्या नावात फरक पडला आहे, तर खंडणी व मेंढणी गावातील दोष जुळत नसल्याने काही शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. मी स्वत: कर्मचाऱ्यांना घेऊन दुरूस्तीचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Tremendous rush for coastal money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.