पैनगंगा अभयारण्यात चितळाची शिकार, तिघे अटकेत; कातडे व इतर अवयव जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 10:54 AM2022-06-24T10:54:19+5:302022-06-24T11:09:13+5:30

या गुन्ह्यात आणखी काही आरोपींच्या सहभागाची शक्यता असून त्या दृष्टीने चौकशी सुरू करण्यात आली आहे.

three accused arrested for chital hunting in Painganga sanctuary | पैनगंगा अभयारण्यात चितळाची शिकार, तिघे अटकेत; कातडे व इतर अवयव जप्त

पैनगंगा अभयारण्यात चितळाची शिकार, तिघे अटकेत; कातडे व इतर अवयव जप्त

Next
ठळक मुद्देउमरखेड तालुक्यातील खरबी वनपरिक्षेत्रातील घटना

उमरखेड (यवतमाळ) : तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात चितळाची शिकार करण्यात आली. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी तीन शिकाऱ्यांना अटक करून त्यांच्याजवळून चितळाचे कातडे, मांस, अवयव, मुंडके व शिकारीसाठी वापरण्यात आलेले जाळे जप्त करण्यात आले.

पैनगंगा अभयारण्याच्या वडगाव नियत क्षेत्रालगत कोठारी येथील एका शाळेमागे वडगाव नियत क्षेत्रातून चितळाची अवैध शिकार करून आणल्याची गुप्त माहिती १९ जून रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास खरबी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयास मिळाली होती. त्यावरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी माहितीची खातरजमा केली. त्याच रात्री १० वाजतापासून आरोपींच्या वराह पालन फार्महाऊसवर नजर ठेवली. तेथे रात्रभर दबा धरून सापळा लावला.

दुसऱ्या दिवशी सोमवारी २० जूनला सकाळी ७.३० वाजता आरोपी बाबू बुध्दाजी हनुमानदास याला चितळाच्या अवयवासह रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून वन्यप्राणी चितळाचे अवयव, मुंडके (शिंगासह), कातडी, पाय (४) जप्त करण्यात आले. चौकशी दरम्यान या गुन्ह्यात मारोती नामदेव आरमाळकर सहभागी असल्याचे आढळले. त्याच्या घराची झडती घेतली असता शिकारीसाठी वापरण्यात आलेले ५ जाळे (वाघूर) जप्त करण्यात आले.

आणखी आरोपीच्या सहभागाची शक्यता

या गुन्ह्यात आणखी काही आरोपींच्या सहभागाची शक्यता असून त्या दृष्टीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. कारवाईची ही कामगिरी विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) पांढरकवडा किरण जगताप, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) पैनगंगा अभयारण्य भारत खेलबाडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) नितीन आटपाडकर, वनपाल व्ही.बी. इंगळे, वनपाल व्ही.आर. सिंगनजुडे, वनरक्षक एस.एल. कानडे, वनरक्षक ए.के. मुजमुले, वनरक्षक बी.आर. काशीदे, वनरक्षक जे.व्ही. शेंबाळे, वनरक्षक जी.एस. मुंडे, वनरक्षक पी.आर. तांबे पुढील चौकशी करीत आहे. 

Web Title: three accused arrested for chital hunting in Painganga sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.