जिल्ह्यात आणखी सव्वाशे फ्लोराईड जलस्रोत वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 09:09 PM2019-05-19T21:09:31+5:302019-05-19T21:10:16+5:30

जिल्ह्यात एकीकडे पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे उपलब्ध असलेले थोडेथोडके जलस्रोतही दूषित असल्याची गंभीरबाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणीतून पुढे आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत ४१६ जलस्रोत फ्लोराईडयुक्त होते.

There are more than twenty-five fluoride water sources in the district | जिल्ह्यात आणखी सव्वाशे फ्लोराईड जलस्रोत वाढले

जिल्ह्यात आणखी सव्वाशे फ्लोराईड जलस्रोत वाढले

Next
ठळक मुद्देभूजलचा अहवाल : पावसाळ्याच्या तोंडावर प्रमाण वाढण्याची भीती

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात एकीकडे पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे उपलब्ध असलेले थोडेथोडके जलस्रोतही दूषित असल्याची गंभीरबाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणीतून पुढे आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत ४१६ जलस्रोत फ्लोराईडयुक्त होते. त्यात आणखी १२२ दूषित जलस्रोतांची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे नजरेने स्वच्छ दिसणारे पाणी पिण्यासाठी योग्य असेलच याची खात्री नाही. पाण्यात तब्बल १३ प्रकारच्या घातक घटकांचा समावेश असल्याचा गंभीर निष्कर्षही भूजल सर्वेक्षणने स्पष्ट केला आहे.
जिल्ह्यातील दोन हजार ४० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे १२ हजार स्रोत आहे. हे पाणी गावकरी दररोज पितात. पिण्यास उपलब्ध असलेले पाणी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर तपासले जाते. हे तपासण्याचे काम जलसेवक आणि आरोग्य सेवक पार पाडतात. पावसाळ्यानंतरचा असाच अहवाल जलसुरक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालामध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याचे स्रोत वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
यापूर्वी जिल्ह्यात ४१६ पाण्याचे स्रोत फ्लोराईडचे असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता ५३८ सोर्स फ्लोराईडचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पूर्वीच्या तुलनेत १२२ फ्लोराईडयुक्त पाण्याचे सोर्स वाढले आहे. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक अधिक खोलवर बोअर करीत असल्याने हा गंभीर प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय आजपर्यंत अनेक सोर्स तपासणीसाठी आरोग्य विभाग आणि भूजल सर्वेक्षण विभागाकडे आलेच नाहीत. यामुळे या सोर्सची माहिती अनेकांना मिळाली नाही. फ्लोराईडयुक्त पाण्याने हाडे ठिसूळ होणे, अकाली वृद्धत्व येणे, दात पिवळे पडणे, किडनी खराब होणे, अशा अनेक बाबी प्रकर्षाने जाणवतात. हे सोर्स कायमचे बंद केले जातात. त्याला पर्यायी पाण्याचे स्रोत उपलब्ध करून द्यायचे असतात. यासंदर्भात पाणीपुरवठा विभाग आणि प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येत आहे.
भूजल सर्वेक्षणच्या सात प्रयोगशाळा
भूजल सर्वेक्षण विभाग आणि आरोग्य विभागाची प्रयोगशाळा पाण्याचे नमुने तपासते. यामध्ये सात प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण विभागाच्या आहेत. यामध्ये दारव्हा, पुसद, उमरखेड, राळेगाव, यवतमाळ, पांढरकवडा, वणी आणि जिल्हा आरोग्य विभागाची स्वतंत्र प्रयोगशाळा आहे.
सिलिका सर्वाधिक धोकादायक
किडनीचा आजार होण्यासाठी केवळ फ्लोराईडच नव्हे तर अनेक बाबीही कारणीभूत असतात. यामध्ये सिलिकाचे प्रमाण पाण्यामध्ये अधिक असल्यास किडनी फेल होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. तर नायट्रेट हा घटकही पाण्यामध्ये आढळतो. यामध्ये मल मूत्र आणि रासायनिक खताचे घटक पाण्यामध्ये मिसळतात. यांना बाहेर काढणे अवघड बाब आहे. याकरिता पावसाळ्यापूर्वीच अशा सोर्स जवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जातात. यासोबतच पाण्यामध्ये टीडीएसचे (टोटल डिझॉल्व्ह सॉलिडस्- पूर्णत: विरघळलेले क्षार) प्रमाणही आढळते. ५०० ते २००० टीडीएस हा घटक योग्य समजला जातो. यापेक्षा जास्त प्रमाण किडनीला घातक आहे. इतकेच नव्हे तर पाण्यामधील आयर्नचे अधिक राहिले तर किडनीला धोका होऊ शकतो.

पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी, केवळ स्वच्छ दिसणारे पाणी योग्य आहे असे समजून वापरु नये. याकरिता गावपातळीवर तपासणीच्या सूचना दिल्या आहेत.
- राजेश सावळे
वरिष्ठ भू-वैज्ञानिक
भूजल सर्वेक्षण विभाग.

Web Title: There are more than twenty-five fluoride water sources in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.