जिल्ह्यात ३ हजार ४६५ व्हीव्हीपॅट उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 09:49 PM2019-03-14T21:49:34+5:302019-03-14T21:49:52+5:30

लोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान प्रक्रिया होण्यासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडीट ट्रायल) वापर केला जाणार आहे. जिल्ह्यात तीन हजार ४६५ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले असून पाच हजार ७५४ बॅलेट युनीट आणि तीन हजार ३४६ कंट्रोल युनीट प्राप्त झाले आहे.

There are 3,665 VVPat available in the district | जिल्ह्यात ३ हजार ४६५ व्हीव्हीपॅट उपलब्ध

जिल्ह्यात ३ हजार ४६५ व्हीव्हीपॅट उपलब्ध

googlenewsNext
ठळक मुद्देजनजागृती : एक लाखाच्यावर व्हीव्हीपॅटमध्ये प्रात्यक्षिकाद्वारे मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान प्रक्रिया होण्यासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडीट ट्रायल) वापर केला जाणार आहे. जिल्ह्यात तीन हजार ४६५ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले असून पाच हजार ७५४ बॅलेट युनीट आणि तीन हजार ३४६ कंट्रोल युनीट प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यात व्हीव्हीपॅट जनजागृतीअंतर्गत एक लाख १३ हजार ४९२ नागरिकांनी प्रात्यक्षिकाद्वारे मतदान केले आहे. त्यांनी दिलेल्या मताची व्हीव्हीपॅटद्वारे खात्री केली आहे. जिल्ह्यात दोन हजार ४९१ मतदान केंद्र राहणार असून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात दोन हजार १८१ मतदान केंद्र राहणार आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी पाच हजार ४८0 बॅलेट युनीट आवश्यक आहेत. प्रत्यक्षात पाच हजार ७५४ बॅलेट युनीट प्राप्त झाले. तसेच तीन हजार ११४ कंट्रोल युनिटची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तीन हजार ३४६ कंट्रोल युनीट प्राप्त झाले. याशिवाय तीन हजार ३६३ व्हीव्हीपॅटची गरज असताना प्रत्यक्षात तीन हजार ४६५ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहे.
लोकसभा निवडणूक पारदर्शी होण्याकरिता व मतदारांनी दिलेल्या मतांची खात्री करण्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे व्हीव्हीपॅटबाबत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम प्रत्येक मतदान केंद्र, तसेच विविध शाळा, महाविद्यालये, जिल्हा परिषद सभागृह, तालुका स्तरावरील कार्यालये आदी ठिकाणी पार पडली. या अंतर्गत दोन टप्प्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात आत्तापर्यंत एक लाख २८ हजार ७३५ नागरिकांना व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. व्हीव्हीपॅट जनजागृतीअंतर्गत एक लाख १३ हजार ४९२ नागरिकांनी मतदान करून त्यांनी दिलेल्या मतांची खात्री केली आहे.
एम-३ ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा वापर
लोकसभा निवडणुकीत एम-३ या ईव्हीएम मशीनचा वापर केला जाणार आहे. ही मशीन सुरू केल्यानंतर तारीख आणि वेळ योग्य दाखविली, तर मशीन योग्य आहे, असे समजले जाते. एम-३ या मशीनमध्ये जास्तीत जास्त दोन हजार मते नोंदविता येतात. व्हीव्हीपॅट म्हणजे एक प्रिंटर असून मतदाराने कोणाला मत दिले, हे त्याला कळणार आहे. यासाठी थर्मल पेपरवरील ५६ बाय ९९ मिमी लांबीची स्लीप बाहेर येईल. ती सात सेकंद मतदाराला बघता येईल. नंतर ती कट होऊन बॅलेट स्लीप बॉक्समध्ये जमा होईल. एका मशीनमधून जवळपास एक हजार २00 ते एक हजार ४00 स्लीप निघणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Web Title: There are 3,665 VVPat available in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.