तंत्रस्नेही शिक्षकांना जुंपले डाटा एन्ट्रीच्या कामाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:09 AM2017-08-19T05:09:37+5:302017-08-19T05:09:39+5:30

वर्गअध्यापनात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, यासाठी शासनाने शिक्षकांना तंत्रस्नेही होण्याचे आवाहन केले.

Technicians work with the data entry of the teachers involved! | तंत्रस्नेही शिक्षकांना जुंपले डाटा एन्ट्रीच्या कामाला!

तंत्रस्नेही शिक्षकांना जुंपले डाटा एन्ट्रीच्या कामाला!

Next

अविनाश साबापुरे ।
यवतमाळ : वर्गअध्यापनात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, यासाठी शासनाने शिक्षकांना तंत्रस्नेही होण्याचे आवाहन केले. मात्र, आता त्याच शिक्षकांकडून चक्क डाटा एन्ट्रीचे काम करवून घेण्याचे आदेश देत शासनाने राज्यभरातील तब्बल दीड लाख तंत्रस्नेही शिक्षकांना हादरवून सोडले आहे.
प्रत्येक शाळा डिजिटल व्हावी, प्रत्येक शिक्षक तंत्रस्नेही व्हावा, असा आग्रह शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांपासून धरला होता. त्याला शिक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. दोन वर्षांत तब्बल १ लाख ५८ हजार ५८३ शिक्षकांनी तंत्रज्ञान अवगत करून घेतले. शासनाच्या संकेतस्थळावर अधिकृत तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांनी नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही नोंदणी दरदिवशी वाढते आहे. दरम्यान, हे शिक्षक अध्यापनात अद्ययावत पद्धतींचा वापर करीत असल्याने त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, १४ आॅगस्ट रोजी शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात या शिक्षकांकडून चक्क डाटा एन्ट्रीचे काम करवून घेण्याची सूचना शिक्षणाधिकाºयांना केली आहे.
राज्यातील प्रत्येक शाळा आणि प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आॅनलाइन केली जात आहे. सरल प्रणालीत ३० सप्टेंबरपर्यंत नोंदविलेल्या विद्यार्थी संख्येवरूनच शिक्षकांची संचमान्यता करून दिली जाणार आहे. त्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत माहिती अपडेट करण्याचे आदेश आहेत. विभागीय स्तरावर ही जबाबदारी शिक्षण उपसंचालकांना, जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाºयांना, तर तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकाºयांना सोपविण्यात आली आहे. परंतु, सरलमध्ये डाटा भरण्यासाठी शिक्षण विभागाकडे तज्ज्ञ मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने या कामासाठी चक्क तंत्रस्नेही शिक्षकांच्या सेवा घेण्याचे आदेश आहेत.
>...तर दिवाळीचा पगार अडवणार
शाळेची इत्थंभूत माहिती ३१ आॅगस्टपर्यंत सरलवर आॅनलाइन करणे आवश्यक आहे. एखाद्या संस्थेअंतर्गत असलेल्या एखाद्या शाळेची माहिती ३१ आॅगस्टपर्यंत सरलवर देण्यात आली नाही, तर त्या संस्थेतील सर्वच शाळांचे व शिक्षणाधिकाºयांचेही वेतन आॅक्टोबर या ऐन दिवाळीच्या महिन्यात अडविले जाणार आहे. त्यामुळे तालुका पातळीवर आता तंत्रस्नेही शिक्षकांच्या मागे डाटा एन्ट्री करून देण्यासाठी दट्ट्या लावला जाणार आहे.

Web Title: Technicians work with the data entry of the teachers involved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.