पुसद उपविभागात व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 09:40 PM2018-09-28T21:40:54+5:302018-09-28T21:43:27+5:30

व्यापारी महासंघ व औषधी विक्रेता संघाने शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला पुसद, उमरखेड, दिग्रस व महागावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभर संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली.

The spontaneous closure of traders in the Pusad subdivision | पुसद उपविभागात व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त बंद

पुसद उपविभागात व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त बंद

Next
ठळक मुद्देदिग्रसमध्ये मोर्चा : उमरखेडमध्ये व्यापाऱ्यांचे एसडीओंना निवेदन, महागावात औषधी दुकाने बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद/उमरखेड/दिग्रस/महागाव : व्यापारी महासंघ व औषधी विक्रेता संघाने शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला पुसद, उमरखेड, दिग्रस व महागावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभर संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली.
आॅनलाईन शॉपिंग, एफडीआयमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणूक, वॉलमार्ट व फ्लिपकार्ट आणि ई-फार्मसीची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच तुरुंगवास व दंडाची रक्कम कमी करावी, जीएसटीव्यतिरिक्त सर्व कर बंद करावे, पाच लाखांपर्यंत इन्कम टॅक्समध्ये सूट द्यावी आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
पुसदमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना पुसद केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रवी पद्मावार, सचिव सुशांत महल्ले, राजेश कोटलवार, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार, गिरीष अग्रवाल, संजय बजाज, प्रवीण व्यवहारे, गजानन आरगुलवार, संजय चिद्दरवार, आनंद धूत, विक्रांत जिलेवार, राहुल डुबेवार, संतोष तडकसे, गजानन गादेवार आदी उपस्थित होते.
उमरखेड येथे चेंबर आॅफ कॉमर्सने गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काळ्या फिती लावून मूकमोर्चा काढला. चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष नारायणदास भट्टड, औषधी संघटनेचे अध्यक्ष विजय भुतडा, विदर्भ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संदीप भट्टड यांच्या नेतृत्वात धान्य, किराणा, औषधी, कपडा, बांधकाम साहित्य, हार्डवेअर आदी दुकानदारांनी रॅलीत सहभाग घेतला.
दिग्रस शहरात व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील बहुतांश व्यापारपेठ बंद होती. नंतर व्यापाऱ्यांनी मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले.
महागाव येथे भारत बंदमध्ये शहरातील औषधी विक्रेत्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे शहरातील सर्व औषधी दुकाने बंद होती. औषधी विक्रेत्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.

Web Title: The spontaneous closure of traders in the Pusad subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.