एकाच बैलावर शेतमशागतीची साधली किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:47 PM2018-02-16T23:47:19+5:302018-02-16T23:47:36+5:30

शेतकरी आत्महत्यांमुळे जिल्ह्याची जागतिकस्तरावर कूप्रसिध्दी झाली आहे. या स्थितीतही आलेल्या संकटाशी दोन हात करून शेती कसणारा आर्णी तालुक्यातील मुकिंदपूरचा परसराम पांडुरंग मेश्राम हा शेतकरीवगार्साठी प्रेरणादायी ठरला आहे.

Simultaneously on the same bullock | एकाच बैलावर शेतमशागतीची साधली किमया

एकाच बैलावर शेतमशागतीची साधली किमया

googlenewsNext
ठळक मुद्देऐपत नसल्याने शोधला मार्ग : दरवर्षी दहा एकर कसतो शेती, मुकिंदपूरच्या परसरामच्या कष्टाला नावीण्यतेची जोड

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : शेतकरी आत्महत्यांमुळे जिल्ह्याची जागतिकस्तरावर कूप्रसिध्दी झाली आहे. या स्थितीतही आलेल्या संकटाशी दोन हात करून शेती कसणारा आर्णी तालुक्यातील मुकिंदपूरचा परसराम पांडुरंग मेश्राम हा शेतकरीवगार्साठी प्रेरणादायी ठरला आहे. एक बैल नसताना एका बैलाच्या भरोशावरच शेतीच्या मशागतीची कामे तो करत आहे. बैलासोबत स्वत: राबून त्याने शेतमाळ फुलविले आहे.
आर्णी तालुक्यातील मुकींदपुर गाव पैनगंगा नदीच्या काठावर वसलेल आडवळणावरील गाव. शेतीव्यतिरिक्त मासेमारी या गावातील मुख्य व्यवसाय. परसराम मेश्राम यांच्याकडे चार एकर शेती आहे. नदी लागून असल्याने दुसऱ्यांचेही शेत त्याने भाड्याने केले आहे. जमेल तेवढे सिंचन करून उत्पन्न वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा शेतकरी करत आहे. मात्र निसर्गाच्या संकटांनी नापिकीच वाट्याला आली आहे. या विपरीत स्थितीत मोठा आघात झाला. या बैलजोडीच्या जीवावर शेतीचा गाडा सुरू होता त्यातील तरणाबांड बैल अचानक मरण पावला. ऐन पेरणीच्या तोंडावर बी-बियाण्याची तजवीज करताना बैल खरेदी करणे शक्य झाले नाही. २००७ पासून आजतागायत परसरामला बैलाला जोड घेता आला नाही. या संकटावर मात करण्यासाठी त्याने स्वत:च खांद्यावर जू घेतले. काही दिवस हा प्रयोग केला. मात्र शारीरिक मर्यादेपुढे जमले नाही. त्यानंतर एका बैलावरच मशागतीचे व शेतीची इतर कामे करता येईल अशा स्वरूपाची अवजारे घरीच तयार केली. नागर, वखर, डवरा यासारखी मशागतीची साधने एका बैलावर चालविण्याचा अभिनव प्रयोग त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.
२५ मे २००७ पासून एकाच बैलावर शेतीतील कामे सुरू असून वखरणे, डवरणे, पेरणे, बैलबंडी हाकलले ही कामे केली जात आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढत गेला. शेतीतील रुची वाढत गेली.
एकाही शासकीय योजनेचा लाभ नाही
शासन अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. उमद्या शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचतच नाही. कृषी विभागातील भ्रष्ट यंत्रणा वशीलेबाजांनाच योजनेचे घबाड देते. शासनाच्या योजनेसाठी शेतीसोडून तालुक्याला येरझारा घालणे न परवडणारे आहे. त्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होत असल्याने कधीच शासकीय योजनेचा नाद केला नाही, असे परसराम पांडुरंग मेश्राम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Simultaneously on the same bullock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.