उदापूरचे पुनर्वसन आजंती रोडवरच करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 09:46 PM2018-08-12T21:46:41+5:302018-08-12T21:46:59+5:30

तालुक्याच्या टाकळी(डोल्हारी) येथे होऊ घातलेल्या मध्यम प्रकल्पासाठी भूसंपादन केले जात आहे. यासाठी उदापूर गावाचे पुनर्वसन होणार आहे. शासनाने पुनर्वसनाकरिता नेर लगत आजंती रोडवर जागा निश्चित केली आहे. मात्र काही लोकांचा या जागेला विरोध आहे.

Rehabilitate Udaapur at Ajanti Road only | उदापूरचे पुनर्वसन आजंती रोडवरच करा

उदापूरचे पुनर्वसन आजंती रोडवरच करा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महिलांसह नागरिकांची धडक, उपोषणाला बसण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्याच्या टाकळी(डोल्हारी) येथे होऊ घातलेल्या मध्यम प्रकल्पासाठी भूसंपादन केले जात आहे. यासाठी उदापूर गावाचे पुनर्वसन होणार आहे. शासनाने पुनर्वसनाकरिता नेर लगत आजंती रोडवर जागा निश्चित केली आहे. मात्र काही लोकांचा या जागेला विरोध आहे. दरम्यान, आजंती रोडवरच पुनर्वसन करावे, अशी भूमिका काही लोकांनी घेतली आहे, तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
ग्रामसभेच्या ठरावानुसारच आजंती रोडवरील जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र काही लोकांकडून राजकीय द्वेषापोटी अडथळे आणले जात आहे. सदर जागा वस्तीसाठी योग्य असतानाही प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे. नियोजित जागेवरच पुनर्वसन न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ज्ञानोबा गीते, शोभा गीते, सुलभा घुगे, गणेश खाडे, रमेश भोयर, चंद्रकला भोयर, शरद खडसे, विजय सांगळे, संजय सांगळे, कांता भेंडेकर यांच्यासह २०० नागरिकांच्या स्वाक्षºयांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. उदापूर गावाच्या पुनर्वसनासाठी यापूर्वी इतर ठिकाणच्याही जागा सुचविण्यात आल्या होत्या. प्रशासनाने आजंती रोडवरील जागा निश्चित केली आहे.
भूसंपादन प्रस्तावाला स्थगितीची शिफारस
उदापूरचे पुनर्वसन आजंती रोडवर होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाला माजी सरपंच अजय भोयर आदींच्या नेतृत्त्वात गावकऱ्यांनी निवेदन दिले होते. जमीन खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले होते. या निवेदनाचा विचार करत आजंती रोडवरील जागेचा भूसंपादन प्रस्ताव स्थगित ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसे पत्र यवतमाळ प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ग.ल. राठोड यांनी जिल्हाधिकारी (भूसंपादन) यांना दिले आहे.

Web Title: Rehabilitate Udaapur at Ajanti Road only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.