दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:15 PM2018-02-06T23:15:45+5:302018-02-06T23:15:55+5:30

जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. या संकटाचा सामना सर्वांनी मिळून करायचा आहे. त्यासाठी ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ ही एक चांगली संधी आहे. या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाचे अतिशय चांगले काम करून दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत,.....

Ready to face drought | दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज

दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज

Next
ठळक मुद्दे जिल्हाधिकारी : वॉटर कप स्पर्धा प्रशिक्षणासाठी चमू रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. या संकटाचा सामना सर्वांनी मिळून करायचा आहे. त्यासाठी ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ ही एक चांगली संधी आहे. या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाचे अतिशय चांगले काम करून दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
वॉटर कप स्पर्धा प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्यातील पहिली चमू बुधवारी रवाना झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थ्यांच्या बसला हिरवी झेंडी दाखवितांना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, डॉ. नितीन खर्चे, पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळे, तालुका समन्वयक समाधान इंगळे, आश्विनी गवारे, एसटी महामंडळाचे यवतमाळ आगार व्यवस्थापक एस.बी. डफळे आदी उपस्थित होते.
खानगाव, शिवणी, भारी, कापरा, मडकोना, धानोरा, बोदगव्हाण, तिवसा आणि झुली या नऊ गावातील ४५ नागरिकांची पहिली बॅच आज रवाना झाली. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात वाठोडा येथे चार दिवसांचे सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यावर्षीच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यात सर्वाधिक तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहे. यवतमाळ, दारव्हा, कळंब, उमरखेड, राळेगाव आणि घाटंजी या तालुक्यांचा यात समावेश आहे.

Web Title: Ready to face drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.