जिल्ह्यात गारांसह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 08:49 PM2019-03-20T20:49:53+5:302019-03-20T20:53:58+5:30

जिल्ह्यात अनेक भागात गारांसह बुधवारी सायंकाळी वादळी पाऊस झाला. काही ठिकाणी तुरळक तर कुठे जोरदार सरी कोसळल्या. वणी परिसरात तुरळक गार पडली. राळेगाव तालुक्यातील खैरीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

Rain with sleet in the district | जिल्ह्यात गारांसह पाऊस

जिल्ह्यात गारांसह पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देखैरी जोरदार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात अनेक भागात गारांसह बुधवारी सायंकाळी वादळी पाऊस झाला. काही ठिकाणी तुरळक तर कुठे जोरदार सरी कोसळल्या. वणी परिसरात तुरळक गार पडली. राळेगाव तालुक्यातील खैरीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यवतमाळ तालुक्यातही पावसाच्या सरी कोसळल्याने उष्म्यापासून काहिसा दिलासा मिळाला.
बुधवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वणी परिसरात बोराच्या आकाराच्या गारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते.
सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आकाशात अचानक ढग तयार झाले. ६.३० वाजता सोसाट्याचा वारा सुटून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. सुमारे एक तास पाऊस कोसळला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. होलीका दहनाच्या ऐनवेळी पाऊस कोसळल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
खैरी जोरदार पाऊस
खैरी : परिसरात बुधवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास परिसरात धुव्वाधार पाऊस कोसळला. या पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतशिवारात गहू आणि हरभऱ्याचे पीक उभे आहे. सोबतच अनेक शेतकऱ्यांनी शेतात तुरीची गंजी लावून ठेवली आहे. पावसामुळे या पिकांना फटका बसला. त्यामुळे दुष्काळच्या सावटात सापडलेल्या शेतकºयांवर नैसर्गिक संकट आले.

Web Title: Rain with sleet in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस