माहूर पंचायतीचे भानुतीर्थ कुंडाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 09:55 PM2019-07-19T21:55:34+5:302019-07-19T21:56:36+5:30

शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये धार्मिक तथा ऐतिहासिक वारसा लाभलेले प्राचीन भानुतीर्थ कुंड आहे. मात्र हे कुंड दुर्लक्षित आहे. नगरपंचायतीने कुंडातील गाळ काढून डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Neglected by Bhanutirtha Kund of Mahur Panchayat | माहूर पंचायतीचे भानुतीर्थ कुंडाकडे दुर्लक्ष

माहूर पंचायतीचे भानुतीर्थ कुंडाकडे दुर्लक्ष

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
माहूर : शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये धार्मिक तथा ऐतिहासिक वारसा लाभलेले प्राचीन भानुतीर्थ कुंड आहे. मात्र हे कुंड दुर्लक्षित आहे. नगरपंचायतीने कुंडातील गाळ काढून डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जुन्या जगदंबा विद्यालयाजवळ भानुतीर्थ कुंड आहे. या कुंडात गाळ साचल्याने आवश्यक जलसंचय होत नाही. त्यामुळे सभोवतालच्या विहिरी, कूपनलिका कोरड्या पडून पाणीटंचाई निर्माण होते. सभोवताल झाडेझुडपे वाढली. त्यामुळे कुंडच अदृश्य होण्याच्या मार्गावर आहे. परिसरात साचलेला कचरा साफ करून पडझड झालेल्या कुंडाची डागडुजी करणे आवश्यक आहे.
गोलाकार असलेले भानुतीर्थ कुंड प्राचीन शिल्पकलेचा अमूल्य ठेवा आहे. त्याची निगा राखणे गरजेचे आहे. गड परिक्रमा यात्रेसाठी संस्थानचे पुजारी याच कुंडातून जल नेतात. त्यामुळे कुंडाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. या परिसरातील घाण स्वच्छ करावी, कंडाचे सुशोभिकरण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Neglected by Bhanutirtha Kund of Mahur Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.