प्रकाशच्या खुनात अखेर टेकाम पिता-पुत्रांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 09:58 PM2017-11-12T21:58:41+5:302017-11-12T21:58:53+5:30

पांढरकवडा तालुक्याच्या झोटींगधरा येथील प्रकाश आत्राम या युवकाच्या खूनप्रकरणात अखेर शनिवारी रात्री आरोपी टेकाम पिता-पुत्रांना सायखेडा (धरण) येथून अटक करण्यात आली आहे.

In the light of light, last night, the father and son were arrested | प्रकाशच्या खुनात अखेर टेकाम पिता-पुत्रांना अटक

प्रकाशच्या खुनात अखेर टेकाम पिता-पुत्रांना अटक

Next
ठळक मुद्देझोटींगधरा येथील प्रकरण : सायखेडाधरण येथून आरोपींना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
रुंझा : पांढरकवडा तालुक्याच्या झोटींगधरा येथील प्रकाश आत्राम या युवकाच्या खूनप्रकरणात अखेर शनिवारी रात्री आरोपी टेकाम पिता-पुत्रांना सायखेडा (धरण) येथून अटक करण्यात आली आहे.
प्रकाश आत्राम या युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुमारे दोन महिन्यानंतर हे प्रकरण पांढरकवडा पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी प्रकाशचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून जागीच उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर प्रकाशचे पिता आनंदराव आत्राम यांच्या तक्रारीवरून झोटींगधरा येथीलच नंदलाल टेकाम व त्यांची दोन मुले अविदास, गोपाल यांच्याविरुद्ध भादंवि ३०२, ५०७, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला.
टेकाम पिता-पुत्र गेल्या काही दिवसांपासून फरार होते. मात्र पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार असलम खॉ पठाण यांच्या नेतृत्वातील पथकाने टेकाम पिता-पुत्रांना शनिवारी रात्री अटक केली. त्यांची पोलीस कोठडी मिळविली जाणार आहे. युवकाचा खून करून प्रेत परस्पर जमिनीत पुरल्याच्या या प्रकरणाने रुंझा, मोहदा व झोटींगधरा परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.
या प्रकरणात प्रेत परस्पर जमिनीत पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र या संबंधीचे कलम तपासादरम्यान लावले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ठाणेदार असलम खॉ पठाण प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.
महानिरीक्षकांची पांढरकवड्यात भेट
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी रविवारी पांढरकवडा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाºयांची छोटेखानी आढावा बैठक घेतल्याचे सांगितले जाते. या बैठकीत झोटींगधरा येथील प्रकाश आत्राम खून प्रकरणावरही चर्चा झाल्याचे व महानिरीक्षक वाकडे यांनी तपासाबाबत पोलीस अधिकाºयांना मार्गदर्शन केल्याचे सांगितले जाते. तत्पूर्वी महानिरीक्षकांनी केळापूर येथे जाऊन सहपरिवार दर्शन घेतले.

Web Title: In the light of light, last night, the father and son were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.