पोलीस लाईन मोजतेय अखेरच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:27 PM2018-09-22T22:27:37+5:302018-09-22T22:28:52+5:30

ग्रामपंचायतची नगरपरिषद होऊन दहा वर्षांचा कालावधी निघून गेला. शहरात नवीन प्रशासकीय इमारती झाल्या, नवी शासकीय निवासस्थाने बनली. मात्र मागील ५० वर्षांपासून पोलीस मोडक्या घरात संसार करताहेत.

The last factor counting the police line | पोलीस लाईन मोजतेय अखेरच्या घटका

पोलीस लाईन मोजतेय अखेरच्या घटका

Next
ठळक मुद्देनेर येथील जीर्ण घरे : ५० पोलीस परिवारांसाठी २३ क्वॉर्टर, नवीन वसाहतीची गरज

किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : ग्रामपंचायतची नगरपरिषद होऊन दहा वर्षांचा कालावधी निघून गेला. शहरात नवीन प्रशासकीय इमारती झाल्या, नवी शासकीय निवासस्थाने बनली. मात्र मागील ५० वर्षांपासून पोलीस मोडक्या घरात संसार करताहेत. घराचे छत केव्हा कोसळेल याचा नेम राहिला नसल्याने पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे.
विविध प्रशासकीय इमारती नेर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या आहे. पोलीस वसाहत मात्र दुर्लक्षित आहे. दोन रुमचे, तेही मोडकळीस आलेले क्वॉर्टर. घरावरील कवेलू कधी पडेल, कुणाच्या शरीराला इजा पोहोचवेल, कुणाचा जीव घेईल याचा नेम नाही. भिंतीतून पाणी झिरपते. वसाहती सभोवताल कचºयाचे ढिगारे, वाढलेली झाडे आहेत. शौचालयाची दुरावस्था झाली आहे. एका कुटुंबातील चार सदस्यांना राहणे या घरात कठीण जाते.
नेर पोलीस ठाण्याची इमारत व वसाहत १९१९ मध्ये बांधण्यात आली. या पोलीस ठाण्यात ४५ पोलीस आणि पाच अधिकारी आहते. पोलिसांसाठी २९ क्वार्टर आहेत. यातील चार क्वार्टरचे आयूष्य संपले तर, दोन क्वार्टर नादूरूस्त आहे. पंचायत समिती, तहसील कार्यालय नवीन, आधुनिक पध्दतीने होणार आहे. बसस्थानक जिल्ह्यात ओळखले जाईल, असे असणार आहे. मग पोलिसांसाठी सुविधापूर्ण क्वार्टर का बांधले जात नाही, हा प्रश्न आहे.
शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र फुटलेल्या कौलारू घरात, पडक्या भिंतीत राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सतत चिंता लागलेली असते. पोलीस अधीक्षकांनी येथील पोलीस वसाहतीत सुधारणेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
इंग्रज राजवटीतील घरे
नेर येथे १९१९ मध्ये पोलीस ठाणे सुरू झाले. ठाणेदार व पाच पोलीस उपनिरीक्षक येथे कार्यरत आहे. गोपनीय विभाग व तालुक्यातील बीट सांभाळणारे जमादार यांच्यासाठी हे पोलीस स्टेशन लहान आहे. पोलीस ठाण्यातून कामकाज कसेतरी चालते. स्वातंत्र्यापूर्वीचे हे पोलीस स्टेशन आहे. याची दैना कधी दूर होईल, हे पाहणे महत्वाचे आहे.

Web Title: The last factor counting the police line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस