‘जेडीआयईटी’च्या ३१ विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय शोध परिषदेत सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:13 PM2018-02-21T22:13:45+5:302018-02-21T22:14:40+5:30

नागपूर येथे टेक्सटाईल असोसिएशन इंडिया विदर्भच्यावतीने १५ वी आंतरराष्ट्रीय आणि ७३ वी राष्ट्रीय परिषद घेण्यात आली.

JDIT's 31 students participate in the international research conference | ‘जेडीआयईटी’च्या ३१ विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय शोध परिषदेत सहभाग

‘जेडीआयईटी’च्या ३१ विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय शोध परिषदेत सहभाग

googlenewsNext
ठळक मुद्देटेक्सटाईल असोसिएशन इंडिया विदर्भच्यावतीने १५ वी आंतरराष्ट्रीय आणि ७३ वी राष्ट्रीय परिषद

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : नागपूर येथे टेक्सटाईल असोसिएशन इंडिया विदर्भच्यावतीने १५ वी आंतरराष्ट्रीय आणि ७३ वी राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. या शोध परिषदेत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षातील ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यामध्ये अंतिम वर्षातील हर्षल सम्रीत, स्वप्नजा राऊत, प्रियंका लोखंडे, भूमिका भलमे, प्रतीक्षा वनकर, प्रणौती म्हैस्कार, सुप्रिया गेडाम, अंजली राऊत, सोनाली किलनाके, रंजना साबळे, नीलिमा खाडे, तृतीय वर्षातील श्वेता पानपाटील, माधवी राऊत, रश्मी मुंदेकर, पूनम लड्डा, संजना इंगोले, धनश्री मॅनमवार, पल्लवी चव्हाण, कुणाल ज्योतवानी, अक्षय कैकाडे, द्वितीय वर्षातील शिफा मोहम्मद कामिल, योगिता ढवळे, दामिनी वरारकर, रागिनी माळी, ज्योती आडपेवार, राशी राय, पूजा येवतीकर, अक्षय मानधना, पूनम सुतार, आम्रपाली टालेकर, तेजस्विनी ठुसे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या परिषदेच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी समजून घेतले. अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकातून मिळालेल्या तंत्रज्ञानाविषयी या शोध परिषदेमध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले. जागतिकस्तरावरील तंत्रज्ञान आणि संशोधन एकाच ठिकाणी पाहायला मिळाले. टेक्सटाईल असोसिएशन इंडिया या संस्थेची स्थापना १९३९ मध्ये झाली. संस्थेचे २३ हजारहून अधिक सभासद आहेत. २६ ठिकाणी या संस्थेचे कार्यालय आहे. या परिषदेमुळे एकाच व्यासपीठावर जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान एकवटल्यामुळे विद्यार्थी तसेच उद्योजकांना माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे.

Web Title: JDIT's 31 students participate in the international research conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.