जवाहरलाल दर्डा स्मृती समारोह : शास्त्रीय संगीताची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:45 PM2017-11-22T23:45:07+5:302017-11-22T23:45:37+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या विसाव्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Jawaharlal Darda Memorial Festival: Classical Music Festival | जवाहरलाल दर्डा स्मृती समारोह : शास्त्रीय संगीताची मेजवानी

जवाहरलाल दर्डा स्मृती समारोह : शास्त्रीय संगीताची मेजवानी

Next
ठळक मुद्देमराठमोळ्या मातीतील महागायक महेश काळे यांची शुक्रवारी मैफल

ऑनलाईन लोकमत 
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या विसाव्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिजात शास्त्रीय संगीताचा नवा आलाप सादर करणारे मराठमोळ्या मातीतील महागायक महेश काळे यांची मैफल शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता येथील ‘प्रेरणास्थळ’वर आयोजित आहे.
‘कट्यार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटातील गाण्यातून घराघरात पोहोचलेले महेश काळे यांची मैफल यवतमाळकरांना ऐकण्याची पहिल्यांदाच संधी उपलब्ध होत आहे. महेश काळे यांनी देश-विदेशात एक हजारांवरून अधिक जाहीर कार्यक्रम केले असून त्यांना ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल आहे. यासोबतच विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शास्त्रीय गायनासोबत उस्ताद जाकीर हुसेन, शिवमनी, त्रिलोक गुर्टु, फ्रँक मार्टिन अशा नामवंत कलावंतांच्या वादनासोबत जुगलबंदीच्या मैफिलीही महेश काळे यांनी रंगविले आहे. अशा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रीय गायकाचे गायन ऐकण्याची संधी यवतमाळकरांना उपलब्ध झाली आहे.
संगीतमय प्रार्थना सभा
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहानिमित्त शनिवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० या वेळात ‘प्रेरणास्थळ’ येथे संगीतमय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात यवतमाळातील प्रतिथयश गायक आणि वाद्यवृंद बाबूजींना संगीतमय आदरांजली अर्पण करतील.
इनामी काटा कुस्त्यांची दंगल
यवतमाळच्या ऐतिहासिक हनुमान आखाड्यात बाबूजींच्या स्मृतिदिनानिमित्त २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता इनामी काटा कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार असून या दंगलीत दहा लाखांच्या बक्षीसांची लयलूट केली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रीय गायक
संगीताचा वारसा लाभलेल्या कुटुंबात महेश काळे यांचा पुणे येथे जन्म झाला. वयाच्या अवघ्या तिसºया वर्षी गोंदावले येथे गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम करणारे महेश काळे आज शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जाणकारांच्या गळ्यातील ताईत झाले आहे. वयाच्या सहाव्या वर्षी आई मीनल काळे यांच्याकडून संगीताची प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर पुरुषोत्तम गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. १९९१ मध्ये त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्यत्व स्वीकारले. संगीत क्षेत्रात नावाजलेला हा हिरा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींचा पदवीधर असून इंजिनिअरींग मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली आहे. सनफ्रॅस्रिस्कोमधील सुमारे १०० मुलांना ते संगीताचे धडे देत आहे. संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार, माझा सन्मान, प्राईड आॅफ इंडिया, प्रवाहरत्न अवार्ड, संस्कृती कला दर्पण पुरस्कार, माणिक वर्मा पुरस्कार, रेडिओ मिरचीचा म्युझिकल अवार्ड, झी सिनेगौरव पुरस्कार आदींचा समावेश आहे.

Web Title: Jawaharlal Darda Memorial Festival: Classical Music Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.