अमोलकचंद महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 09:49 PM2018-12-20T21:49:52+5:302018-12-20T21:50:16+5:30

विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी येथील अमोलकचंद महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा घेण्यात आली. यातून १४ विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

The invention competition in Amolakchand College | अमोलकचंद महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा

अमोलकचंद महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी येथील अमोलकचंद महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा घेण्यात आली. यातून १४ विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मंगळवारी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १४ महाविद्यालयाचे ६२ विद्यार्थी आपल्या संशोधन संकल्पना, विचार आणि प्रकल्पांसह सहभागी झाले होते. यातून अमोलकचंद महाविद्यालयाच्या मिताली सोनटक्के, साक्षी भवरे, फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसदच्या शिवानी वस्तर, प्रिया जाधव, अविनाश मानके, नंदकिशोर तांगडे, अभिजित महेश्कर, चेतन चव्हाण, नानकीबाई वाधवाणी महाविद्यालयाच्या रूपेशा तागडे, सीएमसीएसचे आशीष मोहरे, दारव्हा येथील जिजामाता महाविद्यालयाची भारती दुधे, बोरीअरब येथील कला-वाणिज्य महाविद्यालयाची वैशाली जाधव या विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरावर निवड झाली. फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसदचे शिक्षक एन.डी. खैरे यांची शिक्षक प्रवर्गातून निवड झाली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा यांच्या हस्ते झाले. अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आविष्कार स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रतिकृतींचे परिक्षण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. व्ही.एन. नाठार, जीवतंत्रज्ञान विभागाचे प्रा.डॉ. ए.के. गाडे, समाजशास्त्र विभागाचे डॉ. के.यू. राऊत, मराठी विभागाचे डॉ. पी.आर. कोलते, विधी विभागाच्या डॉ. जावळे, अमोलकचंद महाविद्यालय भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डी.एस. चव्हाण, अर्थशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. आर.बी. भांडवलकर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. डी.बी. प्रबोधनकार यांनी केले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी आविष्कारचे जिल्हा समन्वयक डॉ. ए.बी. लाड, सहसमन्वयक डॉ. सी.आर. कासार, डॉ. एम.डब्ल्यू. भादे, डॉ. एस.एस. गुप्ता, डॉ. एस.आर. कुंभारे आदींनी पुढाकार घेतला. विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सीए प्रकाश चोपडा, प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा यांनी स्पर्धेत सहभागी संशोधक विद्यार्थी व आयोजकांचे कौतुक केले.

Web Title: The invention competition in Amolakchand College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.