Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 02:30 PM2024-05-02T14:30:34+5:302024-05-02T14:48:33+5:30

Fact check Adhir Ranjan Chowdhury Viral Video: अधीर रंजन चौधरींचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा अर्धवट असून संपूर्ण व्हिडीओ त्यांचे म्हणणे स्पष्ट समजू शकते. जाणून घ्या काय आहे यामागचे सत्य.

fact check Adhir Ranjan Chaudhary Viral Video of urging voters to vote for bjp is cropped and misleading see the truth unveiled | Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

Claim Review : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी भाजपाला मत देण्याचे आवाहन केले
Claimed By : Twitter User
Fact Check : चूक

Created By: बूम
Translated By : ऑनलाइन लोकमत

Fact check Adhir Ranjan Chowdhury Viral Video: काँग्रेसचेपश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांचा एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांत व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, अधीर रंजन चौधरी हे मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला नव्हे तर भाजपाला मतदान केले पाहिजे असे आवाहन करत असल्याचा दावा केला जात आहे. बूमच्या सत्य पडताळणीत मात्र हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले आहे. खरे पाहता, अधीर रंजन चौधरी यांचा हा व्हिडीओ क्रॉप केलेला म्हणजे अर्धवट आहे. याचा पूर्ण व्हिडीओ पाहिल्यास त्यात ते वेगळाच दावा करताना दिसत आहेत. व्हिडीओच्या फुल व्हर्जनमध्ये अधीर रंजन चौधरी हे प. बंगालमधील जंगीपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मुर्तझा हुसेन बकूल यांना मत देण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.  

अधीर रंजन चौधरी यांच्या सध्या व्हायरल होणाऱ्या ८ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये ते म्हणताना दिसतात की, तृणमूल काँग्रेसपेक्षा भाजपाला मत दिले तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही भाजपाला मत देऊ शकता. भाजपाला मत देणे ही तृणमूलला मतदान करण्यापेक्षा कधीही चांगलीच बाब म्हणता येईल."   

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, अधीर रंजन चौधरी यांना कल्पना आहे की ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी सरकारमुळे पश्चिम बंगालमधील परिस्थिती किती वाईट आहे. त्यांना त्यांचे जन्मगाव आणि राज्य चांगले राहावे असे वाटते. बंगालवासीयांनो, ते काय म्हणताहेत ते ऐका.

ट्विटर (X) पोस्ट / अर्काईव्ह लिंक

उजव्या विचारसरणीचे समर्थन करणारे ट्विटर हँडल Kreately.in यांनीही हा व्हिडीओ अपलोड करून सोबत कॅप्शन लिहिले आहे, "धन्यवाद अधीर बाबू."

ट्विटर (X) पोस्ट / अर्काईव्ह लिंक

टाइम्स नाऊ, मनीकंट्रोल आणि डेक्कन क्रॉनिकलसह अनेक प्रसारमाध्यमांनी X वर शेअर केलेल्या क्रॉप केलेल्या व्हिडिओच्या आधारे दिशाभूल करणारा दावा केला की चौधरी यांनी लोकांना भाजपला मत देण्यास सांगितले.

तथ्य पडताळणी

चौधरी यांच्या मागे लावलेल्या बॅनरवर पश्चिम बंगालमधील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मुर्तझा हुसेन यांचे नाव असल्याचे BOOM ने पहिले.

त्याचा आधार घेत, आम्ही बंगालीमध्ये कीवर्ड सर्च केले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - पश्चिम बंगालच्या अधिकृत पेजवरून एक फेसबुक पोस्ट आढळली. चौधरी यांचे भाषण 30 एप्रिल 2024 रोजी पेजवरून थेट प्रक्षेपित करण्यात आले होते.

पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मुर्शिदाबादमधील लालगोला येथे भाषण करताना (25:08 मिनिटांपासून पुढे) चौधरी म्हणतात, "मोदी दिवसेंदिवस प्रभावहीन होत गेले आहेत. मोदींकडे पूर्वीसारखा करिष्मा नाही. पहिल्यांदा मोदी म्हणाले होते की ते 400 हून जागा जिंकतील. पण सर्व्हेनुसार मोदींच्या हातून 100 जागा गेल्यात. पुढे आणखीही जागा कमी होतील. तुम्ही अशी चूक करू नका. काँग्रेस आणि डावी आघाडी जिंकली नाही तर भारताच्या धर्मनिरपेक्षतेला धक्का बसेल."

"तृणमूलला मतदान करण्याचा अर्थ... तुम्ही भाजपला मत दिलेले बरे. ... तुम्ही सर्वजण भाजपला मत देऊ शकता. तृणमूलपेक्षा भाजपला मत देणे जास्त चांगले आहे. पण तुम्ही तृणमूलला मत देऊ नका अन् भाजपलाही देऊ नका. सदैव तुमच्या सुखदु:खात तुमची सोबत करेल अशा बकुलला (मुर्तझा हुसेन) साथ द्या."

इंडियन नॅशनल काँग्रेस - पश्चिम बंगाल या पेजवरूनही एक वेगळ्या अँगलचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये चौधरी हे मुर्तझाला मत देण्याचे आवाहन करत आहेत.

पश्चिम बंगाल काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षा सौम्या ऐच यांनी एक पोस्टही केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, "जर तुम्ही संपूर्ण भाषण ऐकले, तर अधीर चौधरी काय म्हणाले ते तुम्हाला समजेल. आम्ही तृणमूल आणि भाजपच्या या द्वेषपूर्ण षडयंत्राचा निषेध करतो. अशा प्रकारे काँग्रेस कधीच पराभूत होऊ शकत नाही."

फेसबुक पोस्ट / अर्काईव्ह लिंक

निष्कर्ष- अधीर रंजन चौधरी यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा अर्धवट आहे. त्यांनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केल्याचा दावा अयोग्य आहे. त्यामुळेच हा व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे.

(सदर फॅक्ट चेक 'बूम' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.)

Web Title: fact check Adhir Ranjan Chaudhary Viral Video of urging voters to vote for bjp is cropped and misleading see the truth unveiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.