‘इव्हीएम’मुक्तीसाठी घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:42 PM2019-06-17T22:42:51+5:302019-06-17T22:43:13+5:30

इव्हिएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका रद्द करण्यात याव्या, या प्रमुख मागणीसाठी भारिप-बहूजन महासंघाच्या वंचित बहूजन आघाडीच्यावतीने सोमवारी येथील तिरंगा चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

Hours for empowering 'EVM' | ‘इव्हीएम’मुक्तीसाठी घंटानाद

‘इव्हीएम’मुक्तीसाठी घंटानाद

Next
ठळक मुद्देभारिप-बहुजन महासंघ : लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात तफावत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : इव्हिएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका रद्द करण्यात याव्या, या प्रमुख मागणीसाठी भारिप-बहूजन महासंघाच्या वंचित बहूजन आघाडीच्यावतीने सोमवारी येथील तिरंगा चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यामध्ये साम्य दिसत नाही. यामुळे मदमोजणी प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करीत भारिप-बहूजन महासंघ प्रणित वंचित बहूजन आघाडीच्या नेतृत्वात राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून यवतमाळात आंदोलन झाले.
यावेळी आंदोलकांनी इव्हीएमवरील मतदानप्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. ‘इव्हिएम हटवा-लोकशाही वाचवा’ असा नाराही यावेळी लावण्यात आला. निवडणूक काळात झालेल्या अनियमिततेवर निवडणूक आयोगाने मौन पाळले आहे. यावरही संशय व्यक्त केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ४८ जागांवर फेर निवडणूक घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे यांनी केले. यावेळी नईम शेख, खंडेराव कांबळे, सुभाष बहादुरे, शैलेश भानवे, नीलेश स्थूल, लक्ष्मण पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

नेर येथे तहसीलदारांना निवेदन सादर
नेर : इव्हीएम बंदच्या मागणीसाठी बहुजन वंचित आघाडीच्यावतीने सोमवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तहसील कार्यालयासमोर दुपारी घंटानाद करण्यात आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघात झालेले मतदान आणि इव्हीएमचे मोजलेले मतदान यात फरक असल्याचे निदर्शनास आले. निवडणूक प्रक्रियेतून इव्हीएम बाद करावे, अशी मागणी तहसीलदार अमोल पोवार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रेमदास रामटेके, शहर प्रमुख प्रशिक धांदे, भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस प्रा. नाजूक धांदे, एमआयएमआयएमचे तालुका अध्यक्ष मोहीम अहेमद अ. सत्तार, भीम तरुण उत्साही मंडळाचे निरंजन मिसळे, उदयभान सोनोने, भाऊराव गायकवाड, गजानन मनवर, नाना अघम, उद्धवराव मिसळे, शेखर गजभिये, राजू वासनिक, चरण रंगारी, मजीद खाँ पठाण, गौतम मिसळे, विश्वनाथ वासनिक, शिवदास मिसळे, राहुल मिसळे, बबनराव सोनुले, प्रफुल्ल मिसळे, सुभाष मिसळे, एस.जी. इंगोले, मनिष मेश्राम, लक्ष्मण वानखडे, सतीश उरकुडे, प्रवीण सोनटक्के, गोविंद लोणारे आदी उपस्थित होते.

Web Title: Hours for empowering 'EVM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.