इंदिरा गांधी यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 10:53 PM2017-11-19T22:53:28+5:302017-11-19T22:53:49+5:30

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांना त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

Honor to Indira Gandhi | इंदिरा गांधी यांना आदरांजली

इंदिरा गांधी यांना आदरांजली

Next
ठळक मुद्देविविध उपक्रम : जीवन दर्शन चित्र प्रदर्शन, रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांना त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. येथील वडगाव रोडवरील ओम सोसायटीत झालेल्या या कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. इंदिराजीव पारमार्थिक ट्रस्ट आणि ओम क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
इंदिराजी जीवन दर्शन चित्र प्रदर्शन, रक्तदान शिबिर, सामान्य ज्ञान स्पर्धा, विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाºया महिलांचा गुणगौरव आदी कार्यक्रम पार पडले. शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे होते.
प्रज्ञाताई चौधरी, रजनीताई शिर्के, साधना उमेश आडे, सुषमा प्रमोद गाढवे, सुनैना अजात, कांताबाई रमेश सुने, संगीता ठाकरे, सरोज देशमुख, शबाना परवीन, समीर शेख या महिलांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी ना. माणिकराव ठाकरे यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन झाले. इंदिरा गांधी यांनी अत्यंत खंबीरपणे नेतृत्व करीत देशाला प्रगतीपथावर नेणारे धोरणात्मक निर्णय घेतले. गोरगरीब लोकांचे जीवनमान या धोरणामुळे उंचावले, असे ते म्हणाले.
वणी येथील प्रा.डॉ. अजय देशपांडे यांचे मार्गदर्शन झाले. सर्व समाजाच्या कल्याणाचा विचार उराशी बाळगणाºया इंदिराजींनी सातत्याने राष्टÑहिताला प्राधान्य दिले. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित होता, असे ते म्हणाले.
माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया आदींनी समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक इंदिराजीव आणि ओम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले. संचालन कैलास राऊत, प्रा. घनश्याम दरणे, बापू देशमुख यांनी केले. आभार अरुण राऊत यांनी मानले.
कार्यक्रमाला आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, माजी मंत्रीद्वय शिवाजीराव मोघे, प्रा.वसंत पुरके, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हा परिषद सभापती नंदिणी दरणे, माजी आमदार विजयाताई धोटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, किशोर दर्डा, बाळासाहेब चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, बसपाचे जिल्हाध्यक्ष तारीक लोखंडवाला, विद्याताई देशमुख, संध्याताई सव्वालाखे, नगरसेविका उषा दिवटे, प्रफुल्ल मानकर, अशोक घारफळकर, सुरेश चिंचोळकर, वसंत घुईखेडकर, पुष्पा नागपुरे, वनिता देशमुख, अशोक बोबडे, प्रा. शंकरराव सांगळे, माणिकराव भोयर, जीवन पाटील, सुभाष पाटील कदम, अनिल गायकवाड, अर्चना धर्मे, मीनाक्षी वेट्टी, अविनाश देशमुख, दिनेश गोगरकर, प्रा. शिर्के, प्रा. राठोड, पंकज देशमुख, बाबू पाटील वानखडे, बाळू काळे, बालू पाटील दरणे, आनंदराव जगताप, एकनाथराव डगवार, राजू निलावार, सतीश बनगीनवार, सुनील काळे, बाळासाहेब सरोदे, आनंद बेंद्रे, निखिल गायकवाड, विवेक दौलतकर, अरविंद वाढोणकर, अमोल गिते, मंगेश गोगरकर, काटोले आदी उपस्थित होते.
सामान्य ज्ञान स्पर्धा
इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्यावर तीन गटात सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. यात सहाशेवर विद्यार्थी सहभागी झाले होते. गटनिहाय तीन, दोन व एक हजार रुपयांचे बक्षीस पहिल्या तीन क्रमांकाना देण्यात आले. प्रत्येक गटात प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
 

Web Title: Honor to Indira Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.