यवतमाळ उपविभागाला जनरल चॅम्पियनशीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:04 PM2018-12-17T22:04:00+5:302018-12-17T22:04:15+5:30

तीन वर्षाच्या खंडानंतर झालेल्या जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यवतमाळ उपविभाग संघाने जबरदस्त कामगिरी करीत सर्वाधिक १३१ गुणांसह जनरल चॅम्पियनशीप पटकावली. ७२ गुणांसह केळापूर विभाग दुसऱ्या स्थानावर राहिला. स्पर्धेतील वेगवान धावपटूचा बहुमान यवतमाळ तहसील कार्यालयाचा अनुप भगत तर महिला गटात राळेगाव तहसीलच्या मयूरी कुडमेथे यांना मिळाला.

General championship in Yavatmal subdivision | यवतमाळ उपविभागाला जनरल चॅम्पियनशीप

यवतमाळ उपविभागाला जनरल चॅम्पियनशीप

googlenewsNext
ठळक मुद्देकेळापूर उपविभाग दुसऱ्या स्थानी : जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तीन वर्षाच्या खंडानंतर झालेल्या जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यवतमाळ उपविभाग संघाने जबरदस्त कामगिरी करीत सर्वाधिक १३१ गुणांसह जनरल चॅम्पियनशीप पटकावली. ७२ गुणांसह केळापूर विभाग दुसऱ्या स्थानावर राहिला. स्पर्धेतील वेगवान धावपटूचा बहुमान यवतमाळ तहसील कार्यालयाचा अनुप भगत तर महिला गटात राळेगाव तहसीलच्या मयूरी कुडमेथे यांना मिळाला.
उपविभागीय अधिकारी यवतमाळ तथा तहसीलदार यवतमाळ, आर्णी, बाभूळगाव, विदर्भ पटवारी संघ, महसूल कर्मचारी, कोतवाल संघटना यांच्यावतीने येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्ह्यातील आठ विभागातील तब्बल ५०० पुरुष-महिला खेळाडूंनी १८ विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदविला.
रविवारी पोलीस कवायत मैदानावर या स्पर्धेचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, आदिवासी विभागाच्या पांढरकवडा प्रकल्प संचालक भुवनेश्वरी, उपविभागीय अधिकारी अनुप खांडे, डॉ. रवींद्र देशमुख, चंद्रकांत जाजू आदी मान्यवर उपस्थित होते.
अंतिम निकाल याप्रमाणे -
सांघिक खेळ : कबड्डी- प्रथम वणी, द्वितीय पुसद. फुटबॉल - प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, द्वितीय यवतमाळ उपविभाग. व्हॉलीबाल - प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, द्वितीय केळापूर. खो खो : पुरुष- प्रथम केळापूर, द्वितीय यवतमाळ विभाग, महिला - प्रथम यवतमाळ उपविभाग, द्वितीय राळेगाव. पुरुष रिले : १०० बाय ४- प्रथम अनुप भगत, पंकज जाधव, तुषार आठवले, अनुप हिवरे (यवतमाळ उपविभाग), द्वितीय वासुदेव झुकोटवार, साईप्रसाद हिंगडे, शिवकांत मोरे, सूरज लोणकर (उमरखेड). महिला - प्रथम ललिता गायकवाड, भारती देशमुख, वर्षा हुपाडे, अर्चना बोंबले (उमरखेड), द्वितीय मयूरी कुडमेथे, रजनी मैंदळकर, संध्या देशकरी, मंजूषा सलाम (राळेगाव).
वैयक्तिक खेळ : १०० मीटर धावणे- प्रथम अनुप भगत (तहसील यवतमाळ), द्वितीय स्वप्नील काळे (पुसद). महिला- प्रथम मयूरी कुडमेथे (राळेगाव), द्वितीय ललिता गायकवाड (महागाव), २०० मीटर धावणे- प्रथम मयूरी कुडमेथे (राळेगाव), द्वितीय ललिता गायकवाड (महागाव). ४०० मीटर धावणे - प्रथम पंकज जाधव (तहसील यवतमाळ), द्वितीय गोपाल जाधव (तहसील घाटंजी).
बॅडमींटन एकेरी : प्रथम- गणेश तेलेवार (तहसील यवतमाळ), द्वितीय विवेक नलगुंडवार (नेर). महिला प्रथम वर्षा ठाकरे (यवतमाळ), द्वितीय भारती देशमुख (उमरखेड). दुहेरी पुरुष : प्रथम शैलेष काळे, गणेश तेलेवार (तहसील यवतमाळ), द्वितीय शैलेश रापर्तीवार, स्वप्नील पानोडे (जिल्हाधिकारी कार्यालय). टेबल टेनिस : पुरुष - प्रथम विजय दावडा (केळापूर), द्वितीय चंद्रकांत पांडे (तहसील यवतमाळ), दुहेरी - प्रथम चंद्रकांत पांडे, गणेश तेलेवार (तहसील यवतमाळ), द्वितीय विजय दावडा, अजिंक्य पांडव (केळापूर). कॅरम एकेरी - प्रथम अशोक पांडव (कळंब), द्वितीय मनिष यंबरवार (तहसील यवतमाळ). दुहेरी - प्रथम शेख नजीर, चंद्रशेखर (मारेगाव), द्वितीय एम. झेड बेग, जे.बी. बावणे (पुसद). महिला एकेरी - अर्चना अलोणे (तहसील यवतमाळ), द्वितीय सुनंदा राऊत (तहसील राळेगाव). दुहेरी प्रथम अर्चना अलोणे, मंगला तिडके (तहसील यवतमाळ), सुनंदा राऊत, छाया दरोडे (राळेगाव). भाला फेक : प्रथम राहुल माहूरे (तहसील वणी), द्वितीय अशोक पंधरे (केळापूर), महिला भावना कोवे (यवतमाळ), द्वितीय संध्या भुरे (पुसद). गोळा फेक : प्रथम विक्रम घुसिंगे (वणी), द्वितीय मिलन राठोड (पुसद), महिला प्रथम रश्मी दरवरे (दारव्हा), द्वितीय भारती राठोड (पुसद). लांब उडी -प्रथम वासुदेव झुकोंटवार (उमरखेड), द्वितीय प्रफुल्ल लोंढे (वणी). महिला - प्रथम भारती राठोड (दिग्रस), अमृता केदार (यवतमाळ). थाळीफेक : प्रथम गिरीधर कारंजकर (नेर), द्वितीय मिलन राठोड (दिग्रस), महिला - प्रथम रश्मी दरवरे (दारव्हा), द्वितीय शिल्पा खैरकार (केळापूर). जलद चालणे : प्रथम संजय गोरलेवार (महागाव), द्वितीय विवेक नलगुंडवार (नेर). महिला प्रथम सविता पांडे (दारव्हा), द्वितीय नंदा दवणे (कळंब).
पुढील आयोजन वणीकडे
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते विजेते संघ व खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. २०१९ च्या महसूल क्रीडा स्पर्धांचे आयोजन वणी उपविभागाकडे सोपविण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन नंदकुमार गोटे, आशिष जयसिंगपूरे, अतुल देशपांडे यांनी केले. आभार बाभूळगावचे तहसीलदार आनंद देवगावकर यांनी मानले.

Web Title: General championship in Yavatmal subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.