अंत्यसंस्काराचे साहित्य देतो विनामूल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 09:48 PM2017-08-17T21:48:48+5:302017-08-17T21:49:11+5:30

संवेदनशील मनाला परिस्थितीचे चटके कळतात अन् त्यांच्यातील भावनिक मन सामाजिक दायित्व पूर्ण करण्यासाठी धडपड करते.

 The funeral poems are free | अंत्यसंस्काराचे साहित्य देतो विनामूल्य

अंत्यसंस्काराचे साहित्य देतो विनामूल्य

Next
ठळक मुद्देयुवकाचा उपक्रम : तालुक्यातील ५३ गावांना स्टिल शिडीचे वाटप करणार

किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : संवेदनशील मनाला परिस्थितीचे चटके कळतात अन् त्यांच्यातील भावनिक मन सामाजिक दायित्व पूर्ण करण्यासाठी धडपड करते. नेर येथील एका युवा व्यापाºयाने अशीच सामाजिक बांधीलकी जपली. शेखर मालाणी असे त्यांचे नाव आहे.
अनेकांना परिस्थितीअभावी घरातील मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्काराच्या सामुग्रीसाठी ईतरांपुढे हात पसरावे लागतात. ही बाब हेरून गेल्या १३ वर्षांपासून शेखर हे साहित्य विनामूल्य देतोय. शेखर मालाणी हे किराणा व्यापारी आहेत. त्यांच्या दुकानात अंत्यसंस्काराची सामुग्री मिळते. हा व्यवसाय शेखरचे वडील सांभाळायचे. त्यांच्या निधनानंतर शेखरने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंत्यसंस्काराचे संपूर्ण साहित्य विनामूल्य देण्याचा संकल्प केला. २००४ पासून त्यांचे हे कार्य अव्याहातपणे सुरू आहे. यात विविध साहित्याचा समावेश आहे.
तालुक्यातील अनेकजण हे साहित्य शेखरच्या दुकानातून नेतात. ग्रामीण भागात अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठी लाकडी शिड्या बनवतात. शहरात प्रत्येक स्मशानभूमित लोखंडी शिड्या उपलब्ध आहे. हा त्रास ग्रामीण भागात होऊ नये, म्हणून तालुक्यातील सहा गावांना शिडी दिल्या असून आणखी ५३ गावांना शिडी देणार आहे. यासाठी त्यांनी आणखी काही सामाजिक व्यक्तींना सोबत घेतले आहे. अनेक जण सामाजिक चळवळीत वेगवेगळी मदत करतात. पण शेखरने गरीब व दुबळ्या लोकांसाठी हा साहित्य व शिळी वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांना संध्या शेखर मालाणी यांची समर्थ साथ मिळाली आहे. त्यांच्या या मदतीने अनेकांना दिलासा मिळाला आहे. शेखरपासून ईतरांनी जर प्रेरणा घेतली, तर सामाजिक चळवळीला निश्चितच बळ लाभणार आहे.

Web Title:  The funeral poems are free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.