वाघाचे बछडे पकडण्यासाठी चार हत्तींचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 10:50 PM2018-12-18T22:50:31+5:302018-12-18T22:51:13+5:30

नरभक्षक वाघिणीच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी आता वनविभागाने मध्य प्रदेशातून चार हत्ती आणले आहेत. या हत्तींच्या साह्याने त्या बछड्यांचा शोध घेण्यात येणार आहे. वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वा ठार करण्यासाठी टी १ कॅप्चर मोहीम हाती घेतली होती.

Four Elephant Strength to catch the tiger's calf | वाघाचे बछडे पकडण्यासाठी चार हत्तींचे बळ

वाघाचे बछडे पकडण्यासाठी चार हत्तींचे बळ

Next
ठळक मुद्देमध्य प्रदेशातून आणले हत्ती : १०० वनाधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज

योगेश पडोळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : नरभक्षक वाघिणीच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी आता वनविभागाने मध्य प्रदेशातून चार हत्ती आणले आहेत. या हत्तींच्या साह्याने त्या बछड्यांचा शोध घेण्यात येणार आहे.
वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वा ठार करण्यासाठी टी १ कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला २ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता यश आले आणि तिला ठार करण्यात आले. त्यामुळे शूटिंग मोहीम ही आता वनविभागाने समाप्त केली. आता मोहीम उरली ती दोन बछड्यांना पकडण्याची. यासाठी वनविभागाने २ नोव्हेंबरपासूनच जंगल परिसरात गस्त लावण्याचे काम सुरू केले. हे दोन छावे १० ते ११ महिन्याचे असून हे केवळ ससा, बकरीचे लहान पिल्लू व लहान प्राण्यांची शिकार करू शकतात. त्यामुळे त्यांचा शिकारीचा प्रश्न मिटला असला तरी त्यांना ट्रँन्क्युलाईज करून पकडण्याची मोहीम आता वनविभाग युद्धपातळीवर राबवित आहे.
या मोहिमेसाठी १०० च्यावर वनअधिकारी व कर्मचारी फौजेसह चार हत्तीही कामाला लागले आहे. त्यामुळे आता या कॅप्चर छावा मोहिमेला चार हत्तींचे बळ मिळाले असून वनविभागाने मोहिमेच्या हालचाली वाढवल्या आहेत. इतकेच नव्हे तर मोहिमेसाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी अजूनही आॅन फिल्ड आहे. मध्य प्रदेशात असलेल्या कान्हा-केसरी अभयारण्यातून वनविभागाला हे हत्ती उपलब्ध करून देण्यात आले आहे. पांढरकवडा वन परिसरात राबवण्यात येत असलेली ही मोहीम उंच-सखल भागात आहे. त्यासोबत या भागात मोठ-मोठी झुडपे वाढलेली आहे. अशा ठिकाणी पायी फिरुन छाव्यांचा शोध घेणे किंवा त्याला बेशुद्ध करणे शक्य नाही. त्यामुळे अशा ठिकाणी हत्तीच्या मदतीन छाव्यांचा शोध घेतल्या जाणार आहे. हे दोन छावे माणसांवर हल्ला करून शिकार करण्याचे तंत्र अद्यापही शिकले नाही. त्यामुळे ते मनुष्यावर हल्ला करणार नाही. या दोघांना पकडण्यासाठी वनविभागाने पथकाचीही निर्मिती केली असून दिवसरात्र ही मोहीम राबवून बछड्यांना पकडण्यात येणार आहे.

 

Web Title: Four Elephant Strength to catch the tiger's calf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ