उमरखेड शेळी बाजारात शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 10:15 PM2017-12-20T22:15:03+5:302017-12-20T22:15:16+5:30

गेल्या २५ वर्षांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरत असलेल्या शेळी बाजारात शेतकºयांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

Farmers' loot in the Umarkhed She go market | उमरखेड शेळी बाजारात शेतकऱ्यांची लूट

उमरखेड शेळी बाजारात शेतकऱ्यांची लूट

Next
ठळक मुद्देबाजार समितीचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांना दिली जाते धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : गेल्या २५ वर्षांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरत असलेल्या शेळी बाजारात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
दर बुधवारी येथे बाजार समितीच्या प्रांगणात शेळी बाजार भरविला जातो. यात जवळपास १५ लाखांची उलाढाल होते. तालुक््यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या शेळ्या विकण्यास येतात. शेळी खरेदीसाठी आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि मराठवाड्यासह इतर भागातील व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. सर्व व्यापारी एका जागी गोळा होऊन शेळ्यांचे दर ठरवून बोली लावतात. यात शेळी विक्रेत्याला बोलूच दिले जात नाही.
बाजारात दलाल व व्यापाऱ्यांचे संगनमत असल्यामुळे अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांच्या शेळ्या खरेदी केल्या जातात. दर कमी मिळाल्यास विक्रेत्यांनी नकार दिल्यास त्यांना चक्क धमकावले जाते. दिवसाढवळ्या शेतकºयांची लूट होताना बाजार समिती डोळे मिटून आहे.
बाजार समितीचे पदाधिकारी, कर्मचारी कुणीही तिकडे फिरकत नाही. त्यामुळे बाजार समिती व व्यापाऱ्यांचे संगनमत तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
शेळीचे दर पाडतात
व्यापारी आणि दलाल मिळून शेळ्यांचे दर पाडतात. कमी दरात शेळी विकण्यास कुी नकार दिला, तय त्यांना दमदाटी केली जाते. बुधवारी एवढी गर्दी असताना पोलीस प्रशासनही बाजाराकडे फिरकत नाही. त्यामुळे खरेदीदारांचे चांगलेच फावत आहे.

व्यापाऱ्यांकडून दमदाटी किंवा आर्थिक फसवणूक होत असल्यास बाजार समितीकडे लेखी तक्रार करावी. चौकशी करून तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल.
अ‍े. डी. भागानगरे
प्रशासक, बाजार समिती

Web Title: Farmers' loot in the Umarkhed She go market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.