पारवा येथे अतिक्रमण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:26 PM2018-07-17T22:26:58+5:302018-07-17T22:27:16+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. यामुळे अनेक किरकोळ दुकानदार हवालदिल झाले.

Encroachment Removal Campaign at Parwa | पारवा येथे अतिक्रमण हटाव मोहीम

पारवा येथे अतिक्रमण हटाव मोहीम

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांची मनमानी : किरकोळ दुकानदार हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्क
पारवा : सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. यामुळे अनेक किरकोळ दुकानदार हवालदिल झाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच संबंधितांना नोटीस बजावली होती. मात्र नोटीसनंतरही अतिक्रमण कायम होते. त्यामुळे मंगळवारी बांधकाम विभागाने पोलिसांच्या सहकार्याने येथे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. यात जेसीबीद्वारे अतिक्रमण हटविण्यात आले. बांधकामचे शाखा अभियंता अविनाश ठाकरे, सुमीत महल्ले, ठाणेदार अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्तात अनेक दुकाने हटविण्यात आली. काही व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण हटविले. यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली.
मंगळवारी सकाळी एक व्यावसायिक टिनाचे शेड काढताना जेसीबीने त्याच्या दुकानाला चिरडून टाकले. त्यामुळे त्याचे २० हजाराचे नुकसान झाले. अतिक्रमण हटविताना अधिकारी-कर्मचाºयांनी मनमानी केल्याचा आरोप किरकोळ दुकानदारांकडून होत आहे. तीन महिन्यांपूर्वी नोटीस दिल्यानंतर आता अचानक एक दिवसापूर्वी दवंडी देवून हे अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे अनेकांना अतिक्रमण हटविणे शक्य झाले नाही. यामुळे व्यावसायिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. अतिक्रमण हटविताना भेदभाव झाल्याचा आरोपही होत आहे. मनमानी पद्धतीने अतिक्रमण हटविण्यात आल्याने चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी आहे.

Web Title: Encroachment Removal Campaign at Parwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.