इलेक्शन इफेक्ट... टंकलेखन परीक्षा दोन महिने लांबल्या एप्रिलची परीक्षा जूनमध्ये

By अविनाश साबापुरे | Published: March 26, 2024 05:02 PM2024-03-26T17:02:54+5:302024-03-26T17:03:48+5:30

आक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या सत्रातील विद्यार्थ्यांचा संगणक टायपिंग परीक्षा १ ते १५ एप्रिल दरम्यान नियोजित होत्या.

Election effect... Typing exam delayed by two months April exam in June | इलेक्शन इफेक्ट... टंकलेखन परीक्षा दोन महिने लांबल्या एप्रिलची परीक्षा जूनमध्ये

इलेक्शन इफेक्ट... टंकलेखन परीक्षा दोन महिने लांबल्या एप्रिलची परीक्षा जूनमध्ये

यवतमाळ : निवडणुकीच्या कामाचा प्रशासनावर ताण वाढला आहे. त्यामुळे राज्यात एप्रिलमध्ये होणाऱ्या टायपिंग परीक्षा तब्बल दोन महिने लांबविण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जूनमध्ये घेतल्या जाणार असल्याचे परीक्षा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

आक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या सत्रातील विद्यार्थ्यांचा संगणक टायपिंग परीक्षा १ ते १५ एप्रिल दरम्यान नियोजित होत्या. या परीक्षेसाठी राज्यभरात एकूण १ लाख ६० हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. परंतु, याच दरम्यान परीक्षा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तसेच शिक्षण विभागातील अन्य अधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीसाठी विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. ही बाब लक्षात घेता परीक्षेकरिता कर्मचारी उपलब्ध होणार नसल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केले. तसेच इतर परीक्षांमुळे अनेक संगणक लॅब आरक्षित असल्याने परिषदेने टंकलेखन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षा आता जूनमध्ये होणार आहेत. १० जूनपासून इंग्रजी विषयाच्या तर १८ जूनपासून मराठी, हिंदी विषयाच्या संगणक टायपिंग परीक्षा होतील. संगणक लघूलेखन परीक्षा जिल्हा स्तरावर २० ते २३ जून दरम्यान होतील. तर मॅन्युअल मशीन टायपिंग परीक्षा ७ व ८ जूनला होणार असल्याचे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी जाहीर केले आहे. 

अर्ज भरण्यासाठी वाढीव वेळ

दरम्यान, परीक्षेचा लांबविलेला कालावधी लक्षात घेता परिषदेने नियमित व रिपिटर विद्यार्थ्यांनाही परीक्षेचा अर्ज भरता यावा, यासाठी वाढीव वेळ दिला आहे. त्यानुसार, नोंदणीची लिंक १५ ते २५ एप्रिल या कालावधीत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या निर्णयामुळे सरासाठी वाढीव वेळही मिळणार असल्याने विद्यार्थी वर्गात आनंद आहे. परंतु, संस्थाचालकांसाठी मात्र हा निर्णय त्रासदायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया राज्य संघटनेचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी कैलास जगताप यांनी दिली.

Web Title: Election effect... Typing exam delayed by two months April exam in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.