महिलादिनी स्वामिनींचा दारूविरूद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 09:55 PM2018-03-08T21:55:15+5:302018-03-08T21:55:15+5:30

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील स्वामिनींनी थेट मुख्यमंत्र्यांना जिल्हा दारूबंदीचे साकडे घातले.

Elder against women and women's alcohol | महिलादिनी स्वामिनींचा दारूविरूद्ध एल्गार

महिलादिनी स्वामिनींचा दारूविरूद्ध एल्गार

Next
ठळक मुद्देजरूरमध्ये नारीशक्ती एकवटली : थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन, मेळाव्यात केले अनुभव कथन

आॅनलाईन लोकमत
घाटंजी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील स्वामिनींनी थेट मुख्यमंत्र्यांना जिल्हा दारूबंदीचे साकडे घातले.
तालुक्यातील जरूर येथे महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. त्यात महिलांनी दारूपासून मुक्ती द्यावी, अशी एकमुखी मागणी केली. महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार द्यावा, असे आर्जवही त्यांनी केले. गेल्या चार वर्षांपासून स्वामिनींतर्फे जिल्हा दारूबंदीची मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे शासन डोळेझाक करीत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला. उपस्थित महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच निवेदनाद्वारे जिल्हा दारूबंदीची मागणी केली. त्यांनी निवेदनातून दारूमुळे होणाºया असह्य त्रासाबाबत आपण अनभिज्ञ कसे, असा प्रश्न उपस्थित केला.
या कार्यक्रमात अनेक महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यांनी आपल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली. महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन नंतर मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. कार्यक्रमाला स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार, संघटक अनंतराव कटकोजवार, सरपंच सुनीता पेंदोर, ललिता राठोड, पोलीस पाटील संजय जीवतोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यशस्वीतेसाठी दिव्यता करमनकर, सुवर्णा कुमरे, स्वाती वनकर, शीतल करमनकर, ज्योत्स्ना आत्राम, मनीषा वनकर, कल्पना कोटनाके, सारिका चहांदे, अर्चना अनाके, ज्योती सिडाम, भागिरथा मोहिते, लता हर्षे, विद्या ढोके, प्रिया हस्ते, इंदिरा उईके, नंदकुमार तुमराम, संजू पेंदोर यांनी सहकार्य केले.

महिला सबलीकरण गरजेचे
केवळ मोजक्याच महिला समोर आल्या म्हणजे संपूर्ण महिलांचे सबलीकरण झाले, असे म्हणता येणार नाही. आजही अनेक महिला अत्याचाराला बळी पडत आहे. त्यांचा छळ केला जात आहे. कोवळ्या वयात अनेक महिला विधवा होत आहेत. दारू हा महिलांसाठी अभिशाप आहे. त्यामुळे संपूर्ण दारूबंदी हाच एकमेव उपाय असल्याचे यावेळी महेश पवार यांनी सांगितले.

Web Title: Elder against women and women's alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.