धनगर समाजाचे जिल्हाभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:01 PM2018-08-13T22:01:44+5:302018-08-13T22:02:13+5:30

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी सोमवारी जिल्हाभरात तीव्र आंदोलन केले. वणीपासून उमरखेडपर्यंत सर्वच तालुक्यांमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सरकारला आरक्षणाच्या घोषणेसाठी निर्वाणीचा इशारा दिला.

District movement of Dhangar community | धनगर समाजाचे जिल्हाभर आंदोलन

धनगर समाजाचे जिल्हाभर आंदोलन

Next
ठळक मुद्देआरक्षणासाठी इशारा : यवतमाळात रास्ता रोको, पुसद, उमरखेड, नेर, आर्णीत मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी सोमवारी जिल्हाभरात तीव्र आंदोलन केले. वणीपासून उमरखेडपर्यंत सर्वच तालुक्यांमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सरकारला आरक्षणाच्या घोषणेसाठी निर्वाणीचा इशारा दिला.
यवतमाळच्या बसस्थानक चौकात समाज बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून लाक्षणिक रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते श्रीधर मोहोड, जिल्हा परिषद सदस्य रेणू शिंदे पाटील, संजय शिंदे पाटील, पांडुरंग खांदवे, डॉ. संदीप धवने, संतोष ढवळे, उत्तम सुंदर, मधुकर चिव्हाणे, ज्ञानदेव गोरडे, ज्ञानेश्वर परचाके, अविनाश जानकर, अनंत कोरडे, गजानन मसाळ, जीवन देवकते, विठ्ठल बुचे, अंकुश गलाट, सुनीता जरांडे, रमेश धादोड, पी.एस. पाटे, एम.एस. पचकट, वसंत खुजे, किशोर नाईक, अण्णा खुजे, राजेश मदने, श्रीधर ढाले, गजानन लोहकर, मंगेश गाडगे, नितीन निवल, भूमन्ना कसरेवार, अनिल पारखे आदी सहभागी होते. लाक्षणिक रास्ता रोको केल्यानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागणीचे निवेदन दिले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान आर्णी, नेर आणि उमरखेड शहरातही धनगर समाज बांधवांनी सोमवारी आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. तर दिग्रस तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. यासोबतच पुसद, महागाव येथेही समाज बांधवांनी निवेदन दिले.

Web Title: District movement of Dhangar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.