कर्जमाफीची घोषणा फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 10:31 PM2017-08-18T22:31:49+5:302017-08-18T22:32:11+5:30

मोठा गाजावाजा करून शासनाने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. परंतु ही घोषणा म्हणजे शेतकºयांच्या डोळ्यात केलेली निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी येथे केला.

Declaration of fraud is fraudulent | कर्जमाफीची घोषणा फसवी

कर्जमाफीची घोषणा फसवी

Next
ठळक मुद्देबच्चू कडू : पांढरकवडात जनआक्रोश सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : मोठा गाजावाजा करून शासनाने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. परंतु ही घोषणा म्हणजे शेतकºयांच्या डोळ्यात केलेली निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी येथे केला.
शुक्रवारी स्थानिक सुराणा जिनिंगमध्ये आयोजित जनआक्रोश सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाऊ पवार, प्रमोद कुदळे, मोहन मामीडवार उपस्थित होते. बच्चू कडू यावेळी म्हणाले, भाजपा सरकार हे अतिशय खोटारडे व बोलघेवडे सरकार असून या सरकारने शेतकºयांसोबत सर्वसामान्यांचाही विश्वासघात केला आहे. शेतकºयांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी शेतकºयांच्या संघटनेच्या सुकाणू समितीला देशद्रोही संबोधणारे मुख्यमंत्री या पदावर कसे राहू शकतात, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आपल्या भाषणातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर जोरदार टीका केली. रामदेवबाबांच्या औषधांना निर्यातीची परवानगी देणारे शासन शेतकºयांच्या मालाला निर्यातीची परवानगी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित करून केंद्र शासन असो की राज्य शासन दोन्हीही सरकार हे शेतकरी विरोध असल्याचा घणाघाती आरोप आमदार बच्चू कडू यांनी यावेळी केला. येथील वाय पॉर्इंटवर बच्चू कडू यांचे आगमन होताच त्यांच्या शेकडो चाहत्यांनी ढोलताशाच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मिरवणुकीने त्यांना वाजतगाजत सभास्थळी आणण्यात आले. प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुदळे, मोहन मामीडवार व रामकृष्ण पाटील यांचीही भाषणे झाली.

Web Title: Declaration of fraud is fraudulent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.