अवयवदानाच्या प्रचारासाठी सायकल स्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:04 PM2018-11-19T22:04:00+5:302018-11-19T22:04:21+5:30

अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी चार तरुण सायकल प्रवासाला निघाले आहेत. त्यांनी पुण्यातील शनिवारवाड्यापासून प्रारंभ केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनमध्ये या सायकल स्वारीचा समारोप होणार आहे. हे युवक ७०० किलोमीटरचा प्रवास करीत रविवारी जिल्ह्यातील कामठवाडा गावात पोहोचले.

Cycle invasion to organize organs | अवयवदानाच्या प्रचारासाठी सायकल स्वारी

अवयवदानाच्या प्रचारासाठी सायकल स्वारी

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारवाडा ते आनंदवन : ७०० किलोमीटर अंतर पार करून जिल्ह्यात पोहोचले, मजल दर मजल गावांमध्ये जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी चार तरुण सायकल प्रवासाला निघाले आहेत. त्यांनी पुण्यातील शनिवारवाड्यापासून प्रारंभ केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनमध्ये या सायकल स्वारीचा समारोप होणार आहे. हे युवक ७०० किलोमीटरचा प्रवास करीत रविवारी जिल्ह्यातील कामठवाडा गावात पोहोचले.
मानवाने मानवासाठी मृत्यूनंतर अवयवदान केल्यास मृत्यूनंतरही अनेकांना जीवदान देता येते. यातून अनेक परिवारांना दिलासा मिळणार आहे. सत्कर्मासाठी त्याचा उपयोग करता येणार आहे. हा विचार समाजात रूजविण्यासाठी हे चार तरूण अविरत कार्य करीत आहे. पुण्यातील शनिवारवाड्यातून निघालेले हे चार तरूण मजल दर मजल करीत गावामध्ये जनजागृती करीत आहे.
अहमदनगरमधील किसन ताकतोडे, सोलापूरमधील राजेंद्र सोनवने, नाशिकमधील सुरज कदम, सातारामधील गणेश नरसाळे या तरूणांचा यामध्ये समावेश आहे. हे तरूण रविवारी कामठवाड्यात आले होते. त्यांनी या ठिकाणी अवयवदानाचा प्रसार केला. अनेकांना अवयवदानाचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. अवयवदानाचे महत्व पटवून देत ही मंडळी आनंदवनात आपल्या सायकलयात्रेचा समारोप करणार आहे. गावागावांमध्ये युवक, ज्येष्ठ नागरिकांना अवयवदानाविषयी माहिती देऊन महत्त्व पटवून दिले जात आहे.

Web Title: Cycle invasion to organize organs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.