लोहारातील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा

By admin | Published: July 31, 2016 01:16 AM2016-07-31T01:16:13+5:302016-07-31T01:16:13+5:30

लोहारा येथील देवीनगरातील मुलीने तीन महिन्यापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावेळी आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

Crime in the murder of a woman in Loharah | लोहारातील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा

लोहारातील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा

Next

यवतमाळ : लोहारा येथील देवीनगरातील मुलीने तीन महिन्यापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावेळी आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. नर्सिंग अभ्यासक्रमाला असलेल्या या तरुणीला तिच्या गावातीलच युवकाकडून मानसिक त्रास दिल्याची बाब उघड झाली. या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून युवकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
प्रतीक्षा नारायण कोवे (१९) या तरुणीने २६ एप्रिल रोजी रात्री दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार तिची आई मंगला नारायण कोवे यांना २७ एप्रिलच्या सकाळी निदर्शनास आला. त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. नंतर प्रतीक्षाच्या मोबाईलवर रुढा (ता.कळंब) येथील मनीष येडमे याचे सातत्याने कॉल आढळून आले. आत्महत्येपूर्वी प्रतीक्षाने मनीषकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रतीक्षाचे मामा संजय उईके यांनी मनीषला समजाविले. त्यानंतरही मनीषकडून प्रतीक्षाला त्रास देण्यात येत होता. या जाचाला कंटाळूनच प्रतीक्षाने आत्महत्या केल्याची तक्रार मंगला कोवे यांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात केली. यावरून आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Crime in the murder of a woman in Loharah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.