भूसंपादन अधिकाऱ्यासह सात जणांवर गुन्हा

By admin | Published: August 20, 2014 11:47 PM2014-08-20T23:47:11+5:302014-08-20T23:47:11+5:30

मृत व्यक्ती जीवंत असल्याचे खोटे दर्शवून आणि बनावट स्वाक्षऱ्या करून भुसंपादनाचा १४ लाख ९७ हजाराचा मोबदला लाटल्या प्रकरणी भुसंपादन अधिकारी, वकील यासह सात जणांवर

Crime against seven people including land acquisition officer | भूसंपादन अधिकाऱ्यासह सात जणांवर गुन्हा

भूसंपादन अधिकाऱ्यासह सात जणांवर गुन्हा

Next

यवतमाळ : मृत व्यक्ती जीवंत असल्याचे खोटे दर्शवून आणि बनावट स्वाक्षऱ्या करून भुसंपादनाचा १४ लाख ९७ हजाराचा मोबदला लाटल्या प्रकरणी भुसंपादन अधिकारी, वकील यासह सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष भुसंपादन व रस्तेविकास प्रकल्प अधिकारी एस.ई. डेकाटे, अ‍ॅड़ प्रवीण हर्षे दोघेही रा. यवतमाळ, रमेश माणिकराव भांडेकर, सिंधु भांडेकर, विकास मुकुंद भांडेकर, सुजाता भांडेकर रा. धुमगतोरा आदींचा गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये समावेश आहे. राळेगाव तालुक्यातील धुमगतोरा शिवारात जयश्री सासवडे आणि जंगलुजी हिरामण कुडमेथे यांची वडिलोपार्जित शेती होती. दरम्यान जयश्री सासवडे यांचा मृत्यु झाला. त्यानंतर ही शेती एका प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. त्यावेळी संबंधित सात जणांनी जयश्री सासवडे या जिवंत असल्याचे दर्शवून खोट्या स्वाक्षऱ्या केल्या. तसेच मोबादल्याची रक्कम लाटली, असे शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत कुडमेथे यांनी म्हटले. त्यावरून गुन्हा नोंदविला. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Crime against seven people including land acquisition officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.