अल्पसंख्यक समाजाच्या हक्कासाठी अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:06 PM2017-10-17T23:06:08+5:302017-10-17T23:06:19+5:30

राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, आॅल इंडिया एकता फोरम व राष्ट्रीय अल्पसंख्यक मोर्चाच्या वतीने पश्चिम विदर्भस्तरीय जलसाचे आयोजन करण्यात आले आहे.

Convention for the Rights of Minority Communities | अल्पसंख्यक समाजाच्या हक्कासाठी अधिवेशन

अल्पसंख्यक समाजाच्या हक्कासाठी अधिवेशन

Next
ठळक मुद्देपत्रकार परिषद : मुस्लीम, शिख, जैन, बुद्धिस्ट, लिंगायत, ख्रिश्चनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, आॅल इंडिया एकता फोरम व राष्ट्रीय अल्पसंख्यक मोर्चाच्या वतीने पश्चिम विदर्भस्तरीय जलसाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने प्रत्येक तालुक्यात काम सुरू असून लाखोंच्या संख्येने मुस्लीम, शिख, जैन, बुद्धिस्ट, लिंगायत, ख्रिश्चन आदी अल्पसंख्यक बांधव यात सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रीय मायनॉरिटी मोर्चातर्फे मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हे अधिवेशन २२ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजता अकोला येथील क्रिकेट क्लब, रेल्वेस्टेशन रोड येथे होऊ घातले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम राहणार आहेत. उद्घाटक आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे (नवी दिल्ली) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य हजरत मौलाना खलीलुल रहेमान सज्जाद नेमानी आहेत. मुख्य मार्गदर्शक म्हणून जमीअत-ए-उलमा हिंद देवबंदचे राष्ट्रीय अध्यक्ष हजरत मौलाना अरशद मदनी उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा वापर करणे म्हणजे लोकशाही संपविणे होय, या विषयावर अधिवेशनात प्रामुख्याने चर्चा होणार आहे. कॉमन सिव्हील कोडवर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण आणि वर्तमान परिस्थिती असा चर्चेचा दुसरा विषय ठेवण्यात आला आहे.
महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भन्ते नागार्जुन सुरई ससाई, ख्रिश्चन धर्मगुरू बिशप डॉ. प्रदीप कांबळे, ग्रामगीता प्रचारक समितीचे सत्यपाल महाराज, बाबा बद्धानीनगर गुरुद्वाराचे माजी प्रमुख मलकीयत सिंग बल, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय प्रभारी प्रा. बी. एस. हस्ते, विश्व लिंगायत परिषद कर्नाटकचे कोरणेश्वर स्वामी, माजी पोलीस महासंचालक एस. एम. मुश्रीफ, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे प्रभारी प्रा. विलास खरात, राष्ट्रीय जैन मोर्चाचे राज्याध्यक्ष डॉ. प्रदीप फलटने, संत गाडगे महाराज यांचे वंशज हभप हरिनारायण जानोरकर आदी विशेष अतिथी राहणार आहेत. हा मोर्चा म्हणजे अल्पसंख्यकांच्या स्वातंत्र्याचे आंदोलन असून प्रत्येकाने तन मन धनाने यात सामील व्हावे, असे आवाहनही पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले.
पत्रकार परिषदेला मन्सूर एजाज जोश, मोहम्मद अस्लम, अभिजित भगत, रेव्हरंड जयवंत तायडे, संजय सावळे, गजानन उल्हे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Convention for the Rights of Minority Communities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.