यवतमाळात रेशीम खरेदी केेंद्राच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:51 AM2018-05-28T00:51:47+5:302018-05-28T00:51:47+5:30

कापसाला पर्यायी पीक म्हणून रेशीम लागवड क्षेत्राकडे शेतकरी वळले आहे. रेशीम लागवडीचे क्षेत्र चौपट वाढणार आहे. तशा नोंदी शेतकऱ्यांनी केल्या आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात जिल्ह्यातच रेशीम कोषाची खरेदी केली जाणार आहे.

Center for the purchase of silk in the yavat | यवतमाळात रेशीम खरेदी केेंद्राच्या हालचाली

यवतमाळात रेशीम खरेदी केेंद्राच्या हालचाली

Next
ठळक मुद्देआज संचालक येणार : रेशीम लागवडीचे क्षेत्र चौपट वाढणार, बाजार समितीमध्ये तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कापसाला पर्यायी पीक म्हणून रेशीम लागवड क्षेत्राकडे शेतकरी वळले आहे. रेशीम लागवडीचे क्षेत्र चौपट वाढणार आहे. तशा नोंदी शेतकऱ्यांनी केल्या आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात जिल्ह्यातच रेशीम कोषाची खरेदी केली जाणार आहे. त्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी रेशीम कोष संचालक सोमवारी यवतमाळात येणार आहे.
गतवर्षी ३७३ शेतकऱ्यांनी रेशीम कोषाची लागवड केली होती. विशेष म्हणजे, मे महिन्याच्या दाहकतेतही रेशीम कोषाचे यशस्वी पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. रेशीम उत्पादन घेताना एका एकरात दीड ते तीन लाख रूपयापर्यंत उत्पादन होते. यामुळे कापसाला पर्यायी पीक म्हणून रेशीम कोष मोलाची मदत करणारे ठरणार आहे.
यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रेशीम लागवडीचे उद्दिष्ट चौपट वाढविण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्याला ५०० शेतकऱ्यांचे उद्दिष्ट आहे. असे असताना २००० शेतकरी रेशीम लागवड करतील या दृष्टीने नियोजन करण्यात आले. १२४९ शेतकºयांनी आतापर्यंत त्यासाठी रेशीम कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे.
लागवड वाढण्याची शक्यता लक्षात घेता यवतमाळच्या बाजार समितीमध्ये रेशीम खरेदी केंद्र उघडण्यावर भर दिला जाणार आहे. त्याची चाचपणी जिल्हा प्रशासन करीत आहे. रेशीमचे संचालक संजय कदम त्या दृष्टीने यवतमाळात सोमवारी भेट देणार आहे. ते रेशीम शेती विषयक आढावा घेणार आहेत.

Web Title: Center for the purchase of silk in the yavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.