शिधापत्रिकेवर दोनदा धान्य घेणाऱ्या वृद्धेवर यवतमाळ जिल्ह्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 02:12 PM2018-02-03T14:12:08+5:302018-02-03T14:13:53+5:30

A case has been registered in Yavatmal district on an old man who took twice ration on the card | शिधापत्रिकेवर दोनदा धान्य घेणाऱ्या वृद्धेवर यवतमाळ जिल्ह्यात गुन्हा दाखल

शिधापत्रिकेवर दोनदा धान्य घेणाऱ्या वृद्धेवर यवतमाळ जिल्ह्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देमहागाईचा चटका दोन ठिकाणावरून मानधन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : देश आणि राज्यात धान्य घोटाळ्यातील बडे आरोपी मोकाट असताना तालुक्यातील शिरजगाव (पांढरी) येथील वृद्धेवर मात्र धान्याची डबल उचल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अंजनाबाई हिरामन भगत (६०) असे गुन्हा दाखल झालेल्या वृद्धेचे नाव आहे. फेब्रुवारी २०१४ पासून त्यांनी दोन शिधापत्रिका बनवून औरंगाबाद व शिरजगाव येथून प्रतिमाह २० किलो धान्याची उचल केली. तसेच दोनही ठिकाणावरून त्यांनी निराधार मानधनाची रक्कम उचलली. ही बाब उघडकीस येताच नेर तहसीलदारांतर्फे अनिल मासाळ यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून वृद्ध अंजनाबाईवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. धान्याची व मानधनाची दुहेरी उचल केल्याप्रकरणी एखाद्या वृद्धेवर गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी धान्य घोटाळे उघडकीस आले. रास्त भाव दुकानातील धान्याची खुल्या बाजारात विक्री करताना अनेकांना रंगेहात पकडण्यात आले. मात्र यापैकी बहुतांश आरोपी अद्यापही समाजात उजळमाथ्याने मोकाट फिरत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासन धजावत नाही. दुसरीकडे एका वृद्धेने केवळ दोन ठिकाणावरून धान्याची उचल केली व निराधार मानधन उचलले म्हणून गुन्हा दाखल केला गेला. यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. मोठ्यांना एक न्याय व गरिबाला दुसरा न्याय दिला जात असल्याचे यावरून बोलले जात आहे. वाढत्या महागाईच्या भस्मासुरामुळे सदर वृद्धेने दोन ठिकाणावरून धान्य उचलल्याचे सांगितले जाते.

Web Title: A case has been registered in Yavatmal district on an old man who took twice ration on the card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा