जागृती अ‍ॅग्रो फूडच्या ठगास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 09:43 PM2017-08-24T21:43:51+5:302017-08-24T21:44:18+5:30

जागृती अ‍ॅग्रो फूड अ‍ॅन्ड प्रोडक्ट प्रा.ली. कंपनीमध्ये जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांनी गुतंवणूक केली. या कंपनीचा मालक राज गायकवाडविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

Awareness agro-food stalker arrested | जागृती अ‍ॅग्रो फूडच्या ठगास अटक

जागृती अ‍ॅग्रो फूडच्या ठगास अटक

Next
ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : ८० लाखांच्या फसवणुकीचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जागृती अ‍ॅग्रो फूड अ‍ॅन्ड प्रोडक्ट प्रा.ली. कंपनीमध्ये जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांनी गुतंवणूक केली. या कंपनीचा मालक राज गायकवाडविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज गायकवाडला आता भंडारा पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी चेन मार्केटिंगनुसार जागृती अ‍ॅग्रो फूड कंपनीत लाखोंची गुंतवणूक केली. कंपनीने शेतकºयांची शेती लिजवर घेऊन त्यांच्या शेतात शेळी पालनाचे प्रकल्प उभे केले. दरम्यान, यात फसवणुकीच्या तक्रारी झाल्या. त्यानंतर राज गायकवाड याच्या पत्नीला अटक करण्यात आली. आता आर्थिक गुन्हे शाखेने राज गायकवाडला तपासाकरिता ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक नितीन पंतगे व त्यांच्या पथकाने केली. गायकवाडविरूद्ध जिल्ह्यात ४५ तक्रारी दाखल आहे.
सभासदांचे असहकार्य
जागृती अ‍ॅग्रोमध्ये जिल्ह्यातील दोनशेच्यावर सभासद आहेत. मात्र केवळ ४५ जणांनीच विरोधात बयाण दिले. उर्वरित सभासद पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही पुढे आले नाही. त्यामुळे तपासात पोलिसांना अडचण येत आहे.

Web Title: Awareness agro-food stalker arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.