सार्वजनिक बांधकाम खात्याला एशियन बँकेचे अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 11:08 AM2019-06-08T11:08:19+5:302019-06-08T11:09:44+5:30

निधीच्या टंचाईचा सामना करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याला आता राज्यातील रस्ते व पुलांच्या निर्मितीसाठी ‘एशियन डेव्हलपमेंट बँक’ हजारो कोटी रुपयांचे अर्थसहाय्य कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे.

Asian Bank Financial Assistance to Public Works Department | सार्वजनिक बांधकाम खात्याला एशियन बँकेचे अर्थसहाय्य

सार्वजनिक बांधकाम खात्याला एशियन बँकेचे अर्थसहाय्य

Next
ठळक मुद्देरस्ते-पुलांची बांधणी ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’तील प्रकल्पांना हजारो कोटींच्या कर्जाचा हातभार

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निधीच्या टंचाईचा सामना करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याला आता राज्यातील रस्ते व पुलांच्या निर्मितीसाठी ‘एशियन डेव्हलपमेंट बँक’ हजारो कोटी रुपयांचे अर्थसहाय्य कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. या अर्थसहाय्याच्या बळावर बांधकाम खात्याचे अनेक प्रकल्प वेगाने मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) यापूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला (पीएमजीएसवाय) अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले होते. त्या बळावरच ‘पीएमजीएसवाय’ने रस्ते उभारणीचे दोन टप्पे पूर्ण केले व आता तिसºया टप्प्यातील प्रस्ताव हाती घेतले आहेत. राज्यात ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ प्रकल्पांतर्गत हजारो किलोमीटरच्या रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. ३० हजार कोटी रुपये बजेट असलेल्या या प्रकल्पातून दहा हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे नियोजन आहे. परंतु या प्रकल्पाला निधीची अडचण निर्माण झाली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या महाराष्ट्र शासनाची तिजोरी रिकामी आहे. प्रकल्पांसाठी पैसा नाही म्हणून एशियन डेव्हलपमेंट बँकेने आता सार्वजनिक बांधकाम खात्याला मदतीचा हात दिला आहे. ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’तील रस्ते व पुलांसाठी कर्ज स्वरूपात बांधकाम खात्याला निधी दिला जाणार आहे.

पहिला टप्पा ६०३ किलोमीटरचा
पहिल्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोकण, पुणे, नाशिक, अमरावती या प्रादेशिक विभागातील ६०३ किलोमीटर रस्ते बांधकामासाठी एशियन डेव्हलप्मेंट बँक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’तील ३४४ किलोमीटरच्या रस्त्यांचे डीपीआर (डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार केले जात आहे. तर २५६ किलोमीटरच्या रस्त्यांचे डीपीआर बनविण्यासाठी कन्सल्टंट नेमण्यात आले आहेत. याशिवाय ७३२ किलोमीटरचे रस्तेही ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ प्रकल्पातून बांधण्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे नियोजन आहे.

यवतमाळातील ५५ किमीचा मार्ग
‘एडीबी’च्या अर्थसहाय्याने हाती घेण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील ६०३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांमध्ये अमरावती विभागांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम-पुसद या ५५ किलोमीटरच्या रस्त्याचा समावेश आहे. तर अमरावती, अकोला जिल्ह्यातील रस्त्यांचा ‘डीपीआर’ अंतिम टप्प्यात आहे.

Web Title: Asian Bank Financial Assistance to Public Works Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.