आरोपीने मारली न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरून उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 09:56 PM2018-01-15T21:56:15+5:302018-01-15T21:56:38+5:30

तारखेवर आणलेल्या खुनातील आरोपीने पळून जाण्याच्या प्रयत्नात चक्क न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारण्याची घटना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी दुपारी ३ वाजता घडली.

The accused jumped from the first mall of the court | आरोपीने मारली न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरून उडी

आरोपीने मारली न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरून उडी

Next
ठळक मुद्देपळून जाण्याचा प्रयत्न : हात आणि पाय फ्रॅक्चर, खुनातील आरोपी

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : तारखेवर आणलेल्या खुनातील आरोपीने पळून जाण्याच्या प्रयत्नात चक्क न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारण्याची घटना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी दुपारी ३ वाजता घडली. यात आरोपीचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विनोद बाबाराव कानबाले (३०) रा.नेर असे या आरोपीचे नाव आहे. २०१७ मध्ये खुनाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. सोमवारी न्यायालयात तारखेवर हजर करण्यासाठी आणण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.टी. वानखडे यांच्या कोर्टासमोर आरोपी बसून होता. पुकारा होताच पोलिसांनी त्याच्या हातकडीचा दोर सोडला. याच संधीचा फायदा घेत विनोदने जिन्यावरच्या रेलिंगवरून खाली उडी मारली. आरोपी पळून जातो हे पाहताच पोलीस शिपायानेही त्याच्या पाठोपाठ उडी घेतली. यात आरोपी विनोदच्या डाव्या पायाला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तो जागेवरच विव्हळत पडला होता. गार्डवर असलेल्या पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. शासकीय वाहन बोलाविले. त्यानंतर या आरोपीला शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होता.
तारखेवर आलेल्या आरोपीने अचानक उडी मारून पळण्याचा प्रयत्न का केला, याचा शोध घेणे गरजेचे आहे. यापूर्वीही त्याच्याकडून दोन वेळा असा प्रयत्न झाल्याचे खुद्द पोलिसांकडूनच सांगितले जात आहे.

Web Title: The accused jumped from the first mall of the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.