लाइव न्यूज़
 • 02:08 PM

  मुंबई : 2000 साली बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी शरद पवारांची बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे गेली होत, उद्धव ठाकरेंचा सवाल.

 • 02:07 PM

  मुंबई : घाटकोपर पोलिसांनी केली तोतया अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास अटक. अन्न व्यावसायीकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप.

 • 02:01 PM

  बाळगंगा धरणग्रस्त 3000 शेतकरी पेणहून पदयात्रेने अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकले. 110 टक्के मागण्या मान्य करुनच जाणार- धैर्यशिल पाटील.

 • 01:40 PM

  सोलापूरमधील इंग्रजीचा पेपर व्हायरल प्रकरण. फुटलेला पेपर पुन्हा घेतला जाणार नाही. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांची माहिती. पेपर फुटला असं म्हणता येणार नाही- शकुंतला काळे.

 • 01:30 PM

  बाळगंगा धरणग्रस्त 3000 शेतकरी पेणहून पदयात्रेने जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकले. आमदार धैर्यशिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु.

 • 01:29 PM

  चंद्रपूर : चिमूर वन विभागातील भान्सुली बिटात रस्त्याच्या कडेला वाघाचा ठिय्या. परिसरातील नागरिकांनी केली गर्दी.

 • 01:25 PM

  शिवसेना अजूनही काहींना समजली नाही. शिवसेनेबद्दल अजूनही गैरसमज आहेत. राज ठाकरे-शरद पवार मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंचा टोला.

 • 01:17 PM

  औरंगाबाद महापालिकेतील कचऱ्याचा तीढा कायम. उद्या आरोग्यमंत्र्याबरोबर आंदोलनकर्त्यांची बैठक. आंदोलनकर्त्यांचं मन वळविण्याचा करणार प्रयत्न.

 • 01:01 PM

  मुंबई - दीक्षांत समारंभाचा समारोप झाल्यावरही विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरुच.

 • 12:27 PM

  अकोला : रामदास पेठ पोलीस स्टेशन नजीक मातानगर येथे भीषण आग, दोन सिलेंडर पेटले.

 • 12:12 PM

  गडचिरोली - नक्षलवाद्यांकडून पोलीस पाटलाची हत्या. एटापल्ली तालुक्यातील लांजी गावाजवळील घटना.

 • 11:57 AM

  ठाणे - विविध मागण्यांसाठी ठाणे शहरात घंटा गाडी कामगारांचं काम बंद आंदोलन सुरु. मागण्या मान्य होईपर्यंत गाडी न सोडण्याचा निर्णय.

 • 11:49 AM

  औरंगाबाद: मनपाचे निलंबित अभियंता बाबुलाल कचरु गायकवाड यांच्या घरावर एसीबीचा छापा. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल .

 • 11:46 AM

  मनमोहन सिंग निर्णय कसे घ्यायचे, हे सर्वांनाचा ठाऊक आहे; पवारांच्या विधानावर भाजपाची प्रतिक्रिया

 • 11:39 AM

  गोवा- मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्याला झाले रवाना. स्वतः सादर करणार अर्थसंकल्प. 

All post in लाइव न्यूज़

वसई विरार अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या