Next

शरद पवारांना शुभेच्छा देताना पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा Sharad Pawar | Pankaja Munde

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 02:24 PM2021-12-14T14:24:27+5:302021-12-14T14:24:53+5:30

'परळीत मुंडे साहेबांच्या जयंतीत पवार साहेब सामील' भाजपचे दिवंगत नेते Gopinath Munde आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष Sharad Pawar यांचा जन्मदिवस एकच तो म्हणजे १२ डिसेंबर.. या दिवशी बीडमध्ये गोपीनाथ मुंडे आणि बारामतीत शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा व्हायचा... २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यानंतर गोपीनाथ गडावर दरवर्षी जयंतीचा कार्यक्रम केला जातो. Dhananjay Munde राष्ट्रवादीत गेल्यानंतर परळीत जिथे केवळ गोपीनाथ मुंडेंचा दबदबा होता तिथे १२ डिसेंबरला शरद पवार यांचे कार्यक्रमही मोठ्या धुमधडाक्यात होऊ लागलेत. त्यावरुन १२ डिसेंबरच्या गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना टोला लगावत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. पहा काय म्हणाल्या पंकजा मुंडे..