Next

पवारांना टोमणा मारताना राणे तोंडावर आपटले... पाहा नक्की काय झालं? Nilesh Rane on Sharad Pawar

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 02:20 PM2021-12-16T14:20:55+5:302021-12-16T14:21:56+5:30

Nilesh Rane Sharad Pawar : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल लागले. यात भाजपचच वर्चस्व पाहायला मिळालं. भाजपनं ६ पैकी ४ जागा जिंकल्या तर एकत्र लढूनही महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या दोन जागाच आल्या. आता याच निकालांवरुन निलेश राणेंनी भाजपचं अभिनंदन केलं. पण भाजपला अभिनंदन करताना शरद पवारांना टोमणा मारायचा मोह त्यांना आवरला नाही आणि निलेश राणे तोंडावर पडले. पण त्यामुळे निलेश राणेंचा अभ्यास किती कच्चा आहे याची चर्चा सुरु झाली. पवारांवर टीका करताना निलेश राणेंची फजिती कशी झाली ते सांगणारच आहोत पण त्याआधी बघुयात की निलेश राणेंनी नेमकं काय ट्विट केलं मग बोलुयात त्यांच्या फजितीविषयी...