Next

नितेश राणे सुटले, निलेश राणेंनी कुणाला दिला इशारा?Santosh Parab Case-Nilesh Rane On Nitesh Rane Bail

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 06:35 PM2022-02-10T18:35:53+5:302022-02-10T18:37:57+5:30

संतोष परब हल्ला प्रकरणात आज अखेर नितेश राणे यांना दिलासा मिळाला... सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना जामीन मंजूर केला... यासोबतच प्रतीक्षा होती ती शांत असलेल्या राणे कुटुंबीयांच्या रिअॅक्शनची.. कारण नितेश राणे यांना झालेल्या अटकेनंतर राणे हे तसे शांतच होते... नारायण राणे यांनी तर माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया देणं टाळलं होतं... अशात नितेश राणे यांना जामीन मिळताच निलेश राणे यांनी जी पहिली प्रतिक्रिया दिलेय.. त्या प्रतिक्रियेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणलयं.. कारण जेव्हा बाहेर काढायचं तेव्हा बाहेर काढू, असं म्हणणाऱ्या राणेंनी नेमका कुणाला इशारा दिला.. आणि राणे-ठाकरे वादाचा आता नवा अध्याय महाराष्ट्राला पाहायला मिळणार का? असा प्रश्न पडतोय... निलेश राणे हे आपल्या प्रतिक्रियेत नेमकं काय म्हणाले हे सविस्तर पाहुयात...