Next

सॅम डिसूझासह पत्रकारांचा भांडाफोड: मलिकांनी जारी केलेला VIDEO जसा आहे तसा | Nawab Malik | Sam Dsouza

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 05:45 PM2021-11-07T17:45:40+5:302021-11-07T17:46:11+5:30

दिवाळीच्या ब्रेकनंतर नवाब मलिकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकामागोमाग एक भांडाफोड केले. ज्या सॅम डिसूझाचं नाव पहिल्या दिवसापासून या प्रकरणात येतंय, तो सॅम डिसूझा आहे तरी कोण, याचा गौप्यस्फोट मलिकांनी केलाय. डिसूझाची ऑडिओ क्लिप त्यांनी जारी केलीय. इतकच नाही तर पत्रकार राजीव बजाज आणि प्रदीप नांबियार हे ड्रग्स नेक्ससमध्ये वसुली करणारे पत्रकार आहेत, समीर वानखेडेंच्या जोरावर ते ब्लॅकमेलिंग करायचे असाही गंभीर आरोप मलिकांनी केलाय. त्यांनी राजीव बजाज आणि नांबियार यांची क्लिप जारी केलीय. हे सारे जण समीर वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचे खेळाडू आहेत, यांची एक टोळी आहे असंही मलिक म्हणालेत. आधी पाहुयात सॅम डिसूझाची ऑडिओ क्लिप, त्यावर मलिकांनी काय आरोप केलेत ते..