Next

Aryan Khan प्रकरणावर Shahrukh Khan मौन सोडणार, पत्रकार परिषद घेणार? Shahrukh Khan Press Conference

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 06:38 PM2021-11-07T18:38:36+5:302021-11-07T18:39:19+5:30

गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय ठरलेल्या आर्यन खान मुंबई ड्रग्स प्रकरणात आता शाहरुख खान मौन सोडणार आहे. आर्यनला अटक झाल्यापासून ना शाहरुख कधी माध्यमांसमोर आला ना कधी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट टाकली. इतकंच काय तर आर्यन तुरुंगात होता तेव्हा शाहरुखला मन्नतवर भेटायला येणाऱ्या सर्वांना परत जावं लागायचं कारण शाहरुखनं कुणालाच भेटायची परवानगी दिलेली नव्हती. फक्त सलमान खानच शाहरुखला त्याकाळात भेटू शकला होता. पण आता शाहरुख खान या प्रकारावर मौन सोडणार असल्याची माहिती मिळतेय. शाहरुख खान मुंबईहून कुटुंबासह दिल्लीला रवाना झालाय आणि दिल्लीत जाऊन शाहरुख पत्रकार परिषद घेऊ शकतो किंवा कदाचित सोशल मीडियावर आपली भूमिका व्हिडीओच्या माध्यमातून मांडू शकतो, अशी माहिती मिळतेय.