लाइव न्यूज़
 • 12:12 PM

  नागपुरात 38 वर्षीय आनंद बावरिया या कंत्राटदाराचा मृतदेह आढळला. झीरो माईल परिसरात कारमध्ये आढळला मृतदेह. व्यवसाय नीट होत नसल्याने आत्महत्या केल्याचं मृतदेहाजवळ मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये नमूद.

 • 11:59 AM

  वाशिम : मंगरूळपीरमधील कोळंबी येथे ग्रामसेवकास एक हजार रुपयाची लाच घेताना पकडलं.

 • 11:50 AM

  मुंबई : मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, माटुंगा-सायन स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक ठप्प.

 • 11:26 AM

  मुंबई: गिरगाव चौपाटीवरील कबुतरखाना तोडला; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई

 • 10:23 AM

  कोल्हापूर- गडहिंग्लजच्या काळभैरी मंदिरात चोरी. दागिने, दानपेट्यांसह इतर साहित्य चोरीला.

 • 10:15 AM

  पुणे- डीएसके पुन्हा ससून रूग्णालयात. डॉक्टर्सच्या टीमकडून पुन्हा डीएसकेंची तपासणी. पत्नी हेमंती कुलकर्णींना आज कोर्टात हजर करणार.

 • 10:02 AM

  नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो व त्यांच्या कुटुंबीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी राष्ट्रपती भवनात केले स्वागत.

 • 09:24 AM

  गोंदिया : अल्पवयीन मुलाकडून दुसऱ्या अल्पवयीन मुलाची खेळताना गळा आवळून हत्या, देवरी तालुक्यातील चिंचगड गावातील घटना, अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात.

 • 08:57 AM

  हैदराबाद : केमिकल फॅक्टरीमध्ये लागली आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.

 • 08:01 AM

  काश्मीर: मेंढर सेक्टरमधील पाकिस्तानच्या चौक्या भारताकडून उद्ध्वस्त

 • 07:58 AM

  विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात; राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार, तर भाजपाच्या वाढणार आणखी वाचा...

 • 07:16 AM

  मेहुल चोक्सीची १२०० कोटींची मालमत्ता जप्त, मोदीच्याही संपत्तीवर टाच आणखी वाचा...

 • 07:15 AM

  बांधकाम व्यावसायिक, ज्वेलर्सच्या ठेवी योजना ठरणार नियमबाह्य! आणखी वाचा...

 • 07:14 AM

  मुंबईः महापालिकांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय ६० होणार, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मंजूर

 • 06:49 AM

  मुंबई : मुंबईसह राज्याच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत असून, मुंबईच्या किमान तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत आहे. किमान तापमान १८ हून २२ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, कमाल तापमानही ३२ अंशांवर आले आहे.

All post in लाइव न्यूज़

बुलढाणा अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या