World Environment Day : प्रदुषणामुळे जगणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:49 PM2019-06-05T14:49:32+5:302019-06-05T14:50:01+5:30

जलप्रदुषण, वायुप्रदुषण आणि ध्वनिप्रदुषणाची समस्या वाढीस लागली असून नागरिकांचे जगणे कठीण होत चालल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

World Environment Day: Difficult to live due to pollution | World Environment Day : प्रदुषणामुळे जगणे झाले कठीण

World Environment Day : प्रदुषणामुळे जगणे झाले कठीण

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विविध स्वरूपातील कारणांमुळे पर्यावरणाचे ताळतंत्र पुरते बिघडत चालले असून वाशिम जिल्ह्यालाही याची झळ सहन करावी लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रामुख्याने जलप्रदुषण, वायुप्रदुषण आणि ध्वनिप्रदुषणाची समस्या वाढीस लागली असून नागरिकांचे जगणे कठीण होत चालल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जमिनीच्या अगदी खोलवर जावून मनुष्याने अनेक प्रकारचे शोध लावले, कृत्रिम पद्धतीचा पाऊस देखील पाडला. याशिवाय विज्ञानाची कास धरून इतरही अनेक प्रयोग करून निसर्गावर विजय मिळविण्याचा प्रयत्न झाला; मात्र असे करताना त्याचे पर्यावरणाच्या रक्षणाकडे दुर्लक्ष होत गेल्याने विविध प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. प्राणवायू देणाऱ्या झाडांची वर्षागणिक होत असलेल्या बेसुमार कत्तल पर्यावरणाचा ºहास होण्यास कारणीभूत ठरत आहे. यासह दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांसह जडवाहतूक करणाºया मोठ्या वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने वायुप्रदुषण आणि वाहनांच्या ‘हॉर्न’वर, फटाक्यांच्या आतषबाजीवर तसेच कर्णकर्कश डी.जे.वर कुठल्याही स्वरूपात अद्यापपर्यंत नियंत्रण नसल्याने ध्वनीप्रदुषण वाढीस लागले आहे.
शहरांसह ग्रामीण भागातील नद्या, विहिरी, सांडपाण्याच्या नाल्या सदोदित स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांमधून बाळगली जाणारी उदासिनता आणि प्रशासकीय यंत्रणेच्या असलेल्या दुर्लक्षामुळे बहुतांश जलस्त्रोत दुषीत झाल्याचेही दिसून येत आहे. या सर्वच प्रकारच्या प्रदुषणांचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याने जनजीवन पुरते धोक्यात सापडले आहे. तथापि, ५ जून रोजी जगभरात साजºया केल्या जाणाºया जागतीक पर्यावरण दिनाच्या पृष्ठभुमिवर पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदुषणांपासून कायमची सुटका मिळविण्याचे प्रयत्न व्हायला हवे, असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.
उपाय योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशिम जिल्ह्यात गेल्या काही वर्षाच्या कालावधीत जलप्रदुषण, वायूप्रदुषण, ध्वनिप्रदुषण वाढीस लागल्याने जनजीवन धोक्यात सापडले आहे. असे असताना प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने कुठलेही ठोण धोरण अद्यापपर्यंत आखलेले नाही.
वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत वाशिममध्ये जिल्हास्तरीय प्रशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांची संख्या अधिक आहे. याशिवाय मोठी बाजारपेठ असल्याने नागरिकांची दैनंदिन मोठ्या प्रमाणात वर्दळ राहते. शहरांतर्गत रस्त्यांसह महामार्गावरून दिवसभर धावणाºया वाहनांमधील धुरामुळे वायुप्रदुषणाचे प्रमाण वाढले आहे. अनेक जुन्या आॅटोंमध्ये आजही सर्रास रॉकेल वापरले जाते. त्यावर नियंत्रणासाठी कुठल्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. मोठ्या नाल्यांची इमानेइतबारे स्वच्छता होत नसल्याने पावसाळ्यातील पहिल्याच पावसात घाण पाणी रस्त्यावरून वाहते. तेच पाणी इतर जलस्त्रोतांना मिळत असल्याने जलप्रदुषण वाढले आहे. लग्नकार्य, मिरवणुकांमध्ये नियमांची मोडतोड करून डी.जे. वाजविला जातो. ही बाब ध्वनिप्रदुषणास कारणीभूत ठरत आहे. प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.

प्राणवायू न मिळाल्यास मनुष्याचे जगणे कठीण आहे. असे असताना प्राणवायू देणाºया मोठमोठ्या झाडांची कित्येक वर्षे बिनबोभाट तोड झाली. यामुळे पर्यावरणाचा ºहास होवून प्रदुषण वाढीस लागले आहे. समस्या दिवसागणिक गंभीर होत चालली आहे; मात्र वृक्षतोडीचा प्रकार आजही थांबलेला नाही, हेच खरे दुर्दैव आहे.
- मा.की. मारशेटवार
वृक्षमित्र, वाशिम


जलप्रदुषणावर नियंत्रण मिळविण्याकरिता जनजागृती करण्यासोबतच वेळोवेळी पाणीनमुने तपासून उपाययोजना केल्या जातात. ध्वनिप्रदुषण नियंत्रणासाठी समिती गठीत करून त्यावर नियंत्रण मिळविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासह इतरही स्वरूपातील प्रदुषणावर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी देखील याबाबत सजग असायला हवे.
- ऋषीकेश मोडक जिल्हाधिकारी

Web Title: World Environment Day: Difficult to live due to pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.