वाशिम : डव्हा यात्रेची तयारी अंतीम टप्प्यात; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पार पडली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 07:28 PM2017-12-28T19:28:12+5:302017-12-28T19:28:38+5:30

वाशिम : तालुक्यातील श्रीक्षेत्र डव्हा येथील नाथ नंगे महाराज संस्थानच्या यात्रोत्सवाला येत्या १८ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेतील संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी पूर्वतयारी करण्याबाबत  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने मालेगाव तहसील कार्यालयात २८ डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले.

Washim: Preparation of Dwha Yatra in the final phase; Meeting of District Disaster Management Cell | वाशिम : डव्हा यात्रेची तयारी अंतीम टप्प्यात; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पार पडली बैठक

वाशिम : डव्हा यात्रेची तयारी अंतीम टप्प्यात; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पार पडली बैठक

googlenewsNext
ठळक मुद्दे१८ जानेवारीपासून होणार यात्रेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तालुक्यातील श्रीक्षेत्र डव्हा येथील नाथ नंगे महाराज संस्थानच्या यात्रोत्सवाला येत्या १८ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेतील संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी पूर्वतयारी करण्याबाबत  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने मालेगाव तहसील कार्यालयात २८ डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय महसूल अधिकारी अभिषेक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत संबंधित विभागांना उपाय योजनांच्या सूचना देण्यात आल्या. 
मालेगाव तालुक्यातील डव्हा येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात नाथ नंगे महाराज संस्थानवर भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेत राज्यभरातील लाखो भाविक सहभागी होतात. नववर्षातील १८ ते २४ जानेवारी २०१७ दरम्यान ही यात्रा भरविली जाणार आहे. या यात्रेत यावेळी ४ ते ५ लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने दक्षता बाळगण्याच्या उद्देशाने पूर्वतयारीबाबत मालेगाव तहसील कार्यालयात २८ डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, तहसीलदार राजेश वजिरे यांच्यासह संबंधित सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या यात्रेत यात्रेकरूंच्या सुरक्षेबाबत तयारी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या. यामध्ये यात्रोत्सव काळात भारनियमन न करणे, आगीवर नियंत्रणासाठी अग्नीशमन दलाची गाडी मोकास्थळावर तैनात ठेवणे, यात्रेकरूंसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकणे आदि सूचना पंचायत समिती मालेगावच्या गटविकास अधिकाºयांना देण्यात आल्या. यात्रा कालावधित दंडाधिकारी म्हणून तहसीलदार मालेगाव यांची नियुक्ती करणे, पशूहत्या रोखण्याबाबत पशूसंवर्धन विभागाने सतर्कता बाळगणे, वारंवार संदेश वहनासाठी, नियमबाह्य वीजजोडणी असलेले स्टॉल्स, हॉटेल, दुकानांची तपासणी करून सदर वीज जोडण्या खंडीत करण्यासह शॉर्ट सर्किट न होण्याची खबरदारी वीज वितरणने घेणे, अवैध दारूविक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तत्परतेने कार्यवाही करणे, नारळ फोडण्याच्या जागेवर स्वंयसेवक तैनात करून त्या जागेच्या साफसफाईची काळजी घेणे, मंदीर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे, पार्किंगची व्यवस्था, सुरक्षेसाठी बॅरीगेटस लावणे, शौचासाठी तात्पुरते स्थळ निश्चित करून चर शौचालयाची व्यवस्था करणे, ठिकठिकाणी आरोग्य बूथ ठेवणे, डव्हा गावासह संस्थानकडे जाणाºया रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभाग व जि.प. बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करणे, यात्रोत्सवातील सर्व उपाय योजनांबाबत तहसीलदार व संस्थानिकांनी संबंधित विभागांना पत्रव्यवहार करणे, अन्न व औषधी प्रशासनाने यात्रोत्सव काळात विकल्या जाणाºया खाद्यपदार्थांची तपासणी करणे, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससाठी जागा निश्चित करणे, यात्रोत्सवकाळात गुंड आणि दादागिरी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंध घालणे आदि सुचनांचा समावेश आहे. 

Web Title: Washim: Preparation of Dwha Yatra in the final phase; Meeting of District Disaster Management Cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम