वाशिम : विविध मागण्यांसाठी आयटक संघटना आक्रमक; १७ जानेवारीला कामगारांचा मोर्चा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 07:15 PM2018-01-10T19:15:48+5:302018-01-10T19:16:31+5:30

वाशिम : बांधकाम कामगारांसह इतर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी आयटक संघटनेने  आक्रमक पावित्रा घेतला असून, शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले.

Washim: Organic organization is aggressive for various demands; Workers' Front on 17th January! | वाशिम : विविध मागण्यांसाठी आयटक संघटना आक्रमक; १७ जानेवारीला कामगारांचा मोर्चा! 

वाशिम : विविध मागण्यांसाठी आयटक संघटना आक्रमक; १७ जानेवारीला कामगारांचा मोर्चा! 

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बांधकाम कामगारांसह इतर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी आयटक संघटनेने  आक्रमक पावित्रा घेतला असून, शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले.
१७ जानेवारी रोजी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासुन या मोर्चाची सुरूवात होणार आहे. मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशनचे राज्य सरचिटणीस संजय मंडवधरे, बांधकाम कामगार संघटना जिल्हाध्यक्ष कॉ. शेख सईद शेख हमजा हे करणार आहेत. ४५ व्या भारतीय श्रम संमेलनाच्या शिफारशीनुसार सर्व प्रकल्प कामगारांना कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, आरोग्य सुविधा व तीन हजार रुपये पेन्शन लागु करावे, किमान वेतन १८ हजार रुपये महिना देण्यात यावा, प्रकल्प योजनेत अर्थसंकल्पीय कपात करू नये, २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात प्रकल्प कामगारांसाठी योग्य तरतुद करुन वाढ करण्यात यावी, प्रकल्प योजनांचे खाजगीकरण बंद करावे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करावी, बांधकाम कामगारांना घरे देण्यात यावी, आदी मागण्या प्रलंबित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. या अनुषंगाने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर १७ जानेवारीला मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील बांधकाम कामगार, आशा स्वयंसेविका, मध्यान्ह भोजन कामगार, अंगणवाडी सेविका, मदतनिस, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व प्रकल्प कामगार व असंघटीत कामगार आदींची उपस्थिती राहणार आहे. संघटनेचे डिगांबर अंभोरे, आशा स्वयंसेविका संघटनेच्या जिल्हाध्यक्षा चित्रा भगत, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षा सविता इंगळे, लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हा संघटक संजय बाजड, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हा सचिव रमेश मुंजे, शालेय पोषण आहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा काळे, मंगरुळपीर तालुका अध्यक्षा बेबी भगत, ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हा सचिव रमेश खिल्लारे, बांधकाम कामगार संघटनेचे मानोरा तालुका अध्यक्ष अब्दुल सलाम शेख इब्राहीम, वाशिम तालुका संघटक जगजीवन मनवर, वाशिम शहर अध्यक्ष उमेश बन्सोड, कारंजा तालुका अध्यक्ष तारेक फारुकी, मालेगाव तालुका संघटक संतोष खराबे, रिसोड तालुका संघटक  पद्माकर लांडगे यांनी प्रलंबित मागण्यांसंदर्भात आक्रमक पावित्रा घेतला आहे.

Web Title: Washim: Organic organization is aggressive for various demands; Workers' Front on 17th January!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.