अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 02:44 PM2024-04-30T14:44:11+5:302024-04-30T14:44:41+5:30

अमित शहा यांच्या फेक व्हिडिओप्रकरणी अहमदाबाद क्राइम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे.

Amit Shah Fake Video Case; Jignesh Mevani's PA and an AAP leader arrested | अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक

अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक

Amit Shah Fake Video Case: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या 'फेक' व्हिडिओप्रकरणी अहमदाबाद क्राइम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी काँग्रेसचे गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mewani) यांचा पीए सतीश वनसोला याच्यासह 2 जणांना अटक केली आहे. आरबी बारिया असे दुसऱ्या व्यक्तीचे नाव असून, तो आम आदमी पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेवंत रेड्डींना नोटीस, असाममधून काँग्रेस कार्यकर्त्याला अटक
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनाही समन्स बजावले आहे. त्यांना 1 मे रोजी मोबाईल फोनसह दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिट (सायबर युनिट) समोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, आसाम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून, त्याच्याकडून दोन मोबाईल फोनसह एक लॅपटॉप जप्त केला आहे. रितम सिंह असे या व्यक्तीचे नाव असून, तो काँग्रेसचा वॉर रुम समन्वयक आहे.

अमित शाहंचा काँग्रेसवर हल्लाबोल
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमित शाहंनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, पराभवाच्या भीतीने काँग्रेस खोटे व्हिडिओ दाखवून देशवासीयांची दिशाभूल करत आहे. देशातील आरक्षणावर एससी, एसटी आणि ओबीसींचा अधिकार आहे आणि जोपर्यंत भाजपची सत्ता आहे, तोपर्यंत त्याला कोणी हात लावू शकत नाही. INDI आघाडीला धर्माच्या नावावर आरक्षण द्यायचे आहे, त्यामुळेच त्यांनी कर्नाटकात ओबीसीचे आरक्षण कमी करुन मुस्लिमांना दिले, अशी टीका त्यांनी केली. 

अमित शाहंच्या व्हिडिओमध्ये काय होतं?
अमित शाह यांच्या प्रचार सभेतील क्लिपशी छेडछाड करुन एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यात अमित शहा देशातील आरक्षण संपवणार असल्याचे वक्तव्य टाकण्यात आले आहे. या संदर्भात रविवारी दिल्ली पोलिसांना दोन तक्रारी मिळाल्या होत्या, त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. आयपीसीच्या कलम 153, 153ए, 465, 469, 171जी आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलम 66 सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Amit Shah Fake Video Case; Jignesh Mevani's PA and an AAP leader arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.